S M L

स्टॅलिन यांच्या घरावर सीबीआयचा छापा

21 मार्चचेन्नई : द्रमुकने केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर आज सकाळी करूणानिधी यांचा मोठा मुलगा स्टॅलिन याच्या घरावर सीबीआयने छापा टाकला. स्टॅलिनच्या मुलानं विदेशी बनावटीची कार कस्टम ड्युटी न भरता आणल्याबद्दलची केस सध्या सुरू आहे. आज त्याच्या चौकशीसाठी सीबीआयचं पथक स्टॅलिन च्या घरी गेलं. यावर काँग्रेस सीबीआयचा दुरूपयोग करत असल्याच आरोप द्रमुकनं केला. तर हे सरकार सीबीआयच्या जीवावर टिकलंय ही टीका खरी ठरल्याचं भाजपनं म्हटलं. पण, ही तीव्र प्रतिक्रिया बघताच काँग्रेसची तारांबळ उडाली. खुद्द पंतप्रधानांनी निवेदन काढून असे आदेश सरकारच्या वतीने सीबीआयला दिले गेले नसल्याचं स्पष्ट केलं. सोनिया गांधींनी या प्रकरणी पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री नारायण सामी यांना धारेवर धरल्याची माहिती समोर आली. अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी तर थेट कॅमेर्‍यासमोर येत हा प्रकार दुदैर्वी असल्याचं म्हटलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 21, 2013 04:23 PM IST

स्टॅलिन यांच्या घरावर सीबीआयचा छापा

21 मार्च

चेन्नई : द्रमुकने केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर आज सकाळी करूणानिधी यांचा मोठा मुलगा स्टॅलिन याच्या घरावर सीबीआयने छापा टाकला. स्टॅलिनच्या मुलानं विदेशी बनावटीची कार कस्टम ड्युटी न भरता आणल्याबद्दलची केस सध्या सुरू आहे. आज त्याच्या चौकशीसाठी सीबीआयचं पथक स्टॅलिन च्या घरी गेलं. यावर काँग्रेस सीबीआयचा दुरूपयोग करत असल्याच आरोप द्रमुकनं केला. तर हे सरकार सीबीआयच्या जीवावर टिकलंय ही टीका खरी ठरल्याचं भाजपनं म्हटलं. पण, ही तीव्र प्रतिक्रिया बघताच काँग्रेसची तारांबळ उडाली. खुद्द पंतप्रधानांनी निवेदन काढून असे आदेश सरकारच्या वतीने सीबीआयला दिले गेले नसल्याचं स्पष्ट केलं. सोनिया गांधींनी या प्रकरणी पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री नारायण सामी यांना धारेवर धरल्याची माहिती समोर आली. अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी तर थेट कॅमेर्‍यासमोर येत हा प्रकार दुदैर्वी असल्याचं म्हटलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 21, 2013 04:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close