S M L

'संजय दत्तला माफी द्या'

22 मार्चमुंबई : 1993 च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात बॉलिवूडचा अभिनेता संजय दत्त पुन्हा एकदा तुरूंगात जाणार आहे. मात्र संजय दत्तला माफी द्यावी यासाठी सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश आणि प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनी महाराष्ट्राच्या राज्यापालांना पत्र लिहिलंय. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्तचा सहभाग नसल्यानं त्याची शिक्षा माफ करावी असं या पत्रात काटजूंनी नमूद केलंय. तर दुसरीकडे राजकीय पक्षांचाही संजय दत्तला पाठिंबा वाढतोय. काँग्रेसचे राजीव शुक्ला यांनीही संजय दत्तला पाठिंबा दिला आहे. बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात संजय दत्तने 18 महिन्याची शिक्षा भोगली आहे. त्यामुळे त्याला माफी द्यावी अशी मागणी केली जात आहे. न्यायमूर्ती काटजू यांचं राज्यपालांना पत्र'गेल्या 20 वर्षांत संजयने खूप भोगलंय, अपमान सहन केलाय. त्याने 18 महिने तुरुंगवास भोगलाय. तो दहशतवादी नाही आणि त्याचा बाँबस्फोटांशी थेट संबंध नाही. आता त्याचं लग्न झालंय आणि त्याला दोन मुलं आहेत. त्याचे पालक सुनील दत्त आणि नर्गिस यांनी समाजाच्या आणि देशाच्या चांगल्यासाठी काम केली आहेत. संजयने त्याच्या सिनेमातून गांधीजींच्या आठवणी जागवल्या आहेत. म्हणून मी मागणी करतो की संजय दत्तला माफी द्यावी आणि त्याला मुक्त करावे.' आयबीएन लोकमतचे सवाल - संजय दत्तला माफी का ?- संजय दत्तला देशातल्या सर्वोच्च कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर त्याच्यासाठी हळहळ का ?- दाऊदच्या टोळीने घातपाताच्या हेतूने आणलेले शस्त्र बाळगणार्‍या दोषीला माफ करावं का ?- गुन्ह्याचं गांभीर्य पाहता, दत्तला मोकळं सोडता येणार नाही, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केल्यानंतरही अशी मागणी करणं योग्य आहे का ?- संजय दत्तशी आर्थिक हितसंबंध गुंतले असल्यामुळे बॉलिवूड त्याला पाठिंबा देतंय का ?- दोषी ठरवलेल्या व्यक्तीची बाजू घेणं राजकीय प्रतिनिधींना शोभतं का ?- संजयची सिनेमातली प्रतिमा आणि वास्तवातली कृत्यं यामध्ये त्याचे समर्थक गल्लत करत आहेत का ?- संजय दत्तला माफी देणं म्हणजे बाँबस्फोट पीडितांवर अन्याय नाही का ?

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 22, 2013 09:40 AM IST

'संजय दत्तला माफी द्या'

22 मार्च

मुंबई : 1993 च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात बॉलिवूडचा अभिनेता संजय दत्त पुन्हा एकदा तुरूंगात जाणार आहे. मात्र संजय दत्तला माफी द्यावी यासाठी सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश आणि प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनी महाराष्ट्राच्या राज्यापालांना पत्र लिहिलंय. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्तचा सहभाग नसल्यानं त्याची शिक्षा माफ करावी असं या पत्रात काटजूंनी नमूद केलंय. तर दुसरीकडे राजकीय पक्षांचाही संजय दत्तला पाठिंबा वाढतोय. काँग्रेसचे राजीव शुक्ला यांनीही संजय दत्तला पाठिंबा दिला आहे. बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात संजय दत्तने 18 महिन्याची शिक्षा भोगली आहे. त्यामुळे त्याला माफी द्यावी अशी मागणी केली जात आहे.

न्यायमूर्ती काटजू यांचं राज्यपालांना पत्र

'गेल्या 20 वर्षांत संजयने खूप भोगलंय, अपमान सहन केलाय. त्याने 18 महिने तुरुंगवास भोगलाय. तो दहशतवादी नाही आणि त्याचा बाँबस्फोटांशी थेट संबंध नाही. आता त्याचं लग्न झालंय आणि त्याला दोन मुलं आहेत. त्याचे पालक सुनील दत्त आणि नर्गिस यांनी समाजाच्या आणि देशाच्या चांगल्यासाठी काम केली आहेत. संजयने त्याच्या सिनेमातून गांधीजींच्या आठवणी जागवल्या आहेत. म्हणून मी मागणी करतो की संजय दत्तला माफी द्यावी आणि त्याला मुक्त करावे.'

आयबीएन लोकमतचे सवाल - संजय दत्तला माफी का ?

- संजय दत्तला देशातल्या सर्वोच्च कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर त्याच्यासाठी हळहळ का ?- दाऊदच्या टोळीने घातपाताच्या हेतूने आणलेले शस्त्र बाळगणार्‍या दोषीला माफ करावं का ?- गुन्ह्याचं गांभीर्य पाहता, दत्तला मोकळं सोडता येणार नाही, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केल्यानंतरही अशी मागणी करणं योग्य आहे का ?- संजय दत्तशी आर्थिक हितसंबंध गुंतले असल्यामुळे बॉलिवूड त्याला पाठिंबा देतंय का ?- दोषी ठरवलेल्या व्यक्तीची बाजू घेणं राजकीय प्रतिनिधींना शोभतं का ?- संजयची सिनेमातली प्रतिमा आणि वास्तवातली कृत्यं यामध्ये त्याचे समर्थक गल्लत करत आहेत का ?- संजय दत्तला माफी देणं म्हणजे बाँबस्फोट पीडितांवर अन्याय नाही का ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 22, 2013 09:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close