S M L

शिक्षकाकडून शिक्षकाला मारहाण, ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल

22 मार्चरत्नागिरी : येथे जिल्हा परिषदेच्या चिपळूणमधील दोनवलीच्या प्राथमिक शाळेत एका शिक्षकानं दुसर्‍या शिक्षकाला विद्यार्थ्यांसमोर मारहाण केली. मुलांना शिकवण्यावरून हा वाद झालाय. विशेष म्हणजे मारहाण करणारे शिक्षक प्रकाश गांधी यांना नुकताच जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालाय. प्रकाश गांधी यांच्यावर चिपळूण पोलिसांत ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. प्रकाश गांधी हे मागील 21 दिवसांपासून फरारी आहेत. गांधी यांचे राष्ट्रवादी पक्षाशी लागेबांधे आहेत. त्यामुळे पोलिसांना ते अजून सापडत नाहीत असा आरोप पीडित शिक्षक सुरेश कादवडकर यांनी केला. पीडित शिक्षक सुरेश कादवडकर यांच्यावर गुन्हा मागे घेण्यासाठी राजकीय दबाव आणला जातोय. अनोळखी माणसांमार्फत त्यांना जीवेमारण्याच्या धमक्या दिल्या जात आहे. आरोपी शिक्षक प्रकाश गांधी यांना फक्त राजकीय पाठबळच नाही तर प्रशासनही पाठीशी घालतंय. 22 फेब्रुवारीला ही घटना घडलेय. कोर्टानेही प्रकाश गांधींच्या अटकेचे आदेश दिलेत, त्यांचा अटकपूर्व जामीनही नाकारला. तरीही जिल्हा परिषद आणि पोलिसांकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. गुन्हा नोंद झाल्यानंतर गांधी यांनी दुसर्‍या माणसांमार्फत 15 दिवसांच्या रजेचा अर्ज पाठवला होता. रजा संपून 4 दिवस होऊनही ते हजर झालेले नाहीत. प्रकाश गांधी यांची विद्यार्थ्यांमध्येही दहशत आहे. गांधी विद्यार्थ्यांना कठोर शिक्षाही देतात. छडीने मारहाण करणे, उठाबशा काढायला लावणे अशा शिक्षांचे मोबाईलमध्ये रेकॉर्डिंगही करतात. पालक विचारायला गेल्यावर पालकांना दम देतात. शिक्षक संघटना, ग्रामस्थ यांनी गांधी यांच्यावर कारवाई तातडीनं व्हावी अशी मागणी केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 22, 2013 10:07 AM IST

शिक्षकाकडून शिक्षकाला मारहाण, ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल

22 मार्च

रत्नागिरी : येथे जिल्हा परिषदेच्या चिपळूणमधील दोनवलीच्या प्राथमिक शाळेत एका शिक्षकानं दुसर्‍या शिक्षकाला विद्यार्थ्यांसमोर मारहाण केली. मुलांना शिकवण्यावरून हा वाद झालाय. विशेष म्हणजे मारहाण करणारे शिक्षक प्रकाश गांधी यांना नुकताच जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालाय. प्रकाश गांधी यांच्यावर चिपळूण पोलिसांत ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. प्रकाश गांधी हे मागील 21 दिवसांपासून फरारी आहेत. गांधी यांचे राष्ट्रवादी पक्षाशी लागेबांधे आहेत. त्यामुळे पोलिसांना ते अजून सापडत नाहीत असा आरोप पीडित शिक्षक सुरेश कादवडकर यांनी केला.

पीडित शिक्षक सुरेश कादवडकर यांच्यावर गुन्हा मागे घेण्यासाठी राजकीय दबाव आणला जातोय. अनोळखी माणसांमार्फत त्यांना जीवेमारण्याच्या धमक्या दिल्या जात आहे. आरोपी शिक्षक प्रकाश गांधी यांना फक्त राजकीय पाठबळच नाही तर प्रशासनही पाठीशी घालतंय. 22 फेब्रुवारीला ही घटना घडलेय. कोर्टानेही प्रकाश गांधींच्या अटकेचे आदेश दिलेत, त्यांचा अटकपूर्व जामीनही नाकारला. तरीही जिल्हा परिषद आणि पोलिसांकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. गुन्हा नोंद झाल्यानंतर गांधी यांनी दुसर्‍या माणसांमार्फत 15 दिवसांच्या रजेचा अर्ज पाठवला होता. रजा संपून 4 दिवस होऊनही ते हजर झालेले नाहीत. प्रकाश गांधी यांची विद्यार्थ्यांमध्येही दहशत आहे. गांधी विद्यार्थ्यांना कठोर शिक्षाही देतात. छडीने मारहाण करणे, उठाबशा काढायला लावणे अशा शिक्षांचे मोबाईलमध्ये रेकॉर्डिंगही करतात. पालक विचारायला गेल्यावर पालकांना दम देतात. शिक्षक संघटना, ग्रामस्थ यांनी गांधी यांच्यावर कारवाई तातडीनं व्हावी अशी मागणी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 22, 2013 10:07 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close