S M L

संपादकांवर हक्कभंग प्रस्तावाविरोधात 'आम आदमी'ची निदर्शनं

22 मार्चमुंबई : पीएसआय सचिन सूर्यंवळी यांना मारहाण करणार्‍या आमदारांवर कठोर टीका केल्यामुळे आयबीएन-लोकमतचे संपादक निखिल वागळे आणि एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांच्याविरूध्द हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला गेला. त्याविरोधात राज्यभरातून तीव्र निषेध व्यक्त होतोय. मुंबईत आम आदमी पार्टीच्या वतीने याविरोधात निदर्शनं करण्यात आली. आझाद मैदानात या कार्यकर्त्यांनी हक्कभंगाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आम आदमी पार्टीचे नेते मयांक गांधी, अंजली दमानिया यांनी या निषेध मोर्चाचं नेतृत्व केलं. तसंच आम आदमी पार्टीनं विधानसभा अध्यक्षांना नोटीस दिली आहे. हा हक्कभंग रद्द करा, नाहीतर कायदेशीर कारवाई करू असं या नोटिशीत म्हटलं आहे. विधानसभा अध्यक्षांना नोटीस- अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क बजावणार्‍या संपादकांविरोधात कुठलीही कारवाई करू नये- मीडियाला आपलं म्हणणं मांडण्याचा पूर्ण स्वातंत्र असलं पाहिजे. एखाद्या व्यक्तीला त्यावर आक्षेप असल्यास त्यांना कायदेशीर मार्ग खुले आहेत- हक्कभंगासारख्या कायद्याचा वापर अतिशय काळजीपूर्वक आणि टोकाच्या परिस्थितीत व्हायला हवा- त्यामुळे संबंधित संपादकांना हक्कभंगाची नोटीस बजावू नये. आमच्या विनंतीवर विचार झाला नाही तर आम्हाला कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा लागू शकतो

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 22, 2013 03:03 PM IST

संपादकांवर हक्कभंग प्रस्तावाविरोधात 'आम आदमी'ची निदर्शनं

22 मार्च

मुंबई : पीएसआय सचिन सूर्यंवळी यांना मारहाण करणार्‍या आमदारांवर कठोर टीका केल्यामुळे आयबीएन-लोकमतचे संपादक निखिल वागळे आणि एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांच्याविरूध्द हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला गेला. त्याविरोधात राज्यभरातून तीव्र निषेध व्यक्त होतोय. मुंबईत आम आदमी पार्टीच्या वतीने याविरोधात निदर्शनं करण्यात आली. आझाद मैदानात या कार्यकर्त्यांनी हक्कभंगाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आम आदमी पार्टीचे नेते मयांक गांधी, अंजली दमानिया यांनी या निषेध मोर्चाचं नेतृत्व केलं. तसंच आम आदमी पार्टीनं विधानसभा अध्यक्षांना नोटीस दिली आहे. हा हक्कभंग रद्द करा, नाहीतर कायदेशीर कारवाई करू असं या नोटिशीत म्हटलं आहे.

विधानसभा अध्यक्षांना नोटीस

- अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क बजावणार्‍या संपादकांविरोधात कुठलीही कारवाई करू नये- मीडियाला आपलं म्हणणं मांडण्याचा पूर्ण स्वातंत्र असलं पाहिजे. एखाद्या व्यक्तीला त्यावर आक्षेप असल्यास त्यांना कायदेशीर मार्ग खुले आहेत- हक्कभंगासारख्या कायद्याचा वापर अतिशय काळजीपूर्वक आणि टोकाच्या परिस्थितीत व्हायला हवा- त्यामुळे संबंधित संपादकांना हक्कभंगाची नोटीस बजावू नये. आमच्या विनंतीवर विचार झाला नाही तर आम्हाला कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा लागू शकतो

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 22, 2013 03:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close