S M L

31 मार्चपासून अण्णा हजारेंच्या देशव्यापी दौरा

27 मार्चराळेगणसिद्धी : जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे 31 मार्च ते 18 एप्रिल या दरम्यान देशव्यापी दौरा करणार आहेत. अण्णांची या जनतंत्र यात्रेची सुरवात पंजाबमधल्या अमृतसरमधून होणार आहे. 17 एप्रिलला या पहिल्या टप्याची शेवटची सभा हरिद्वारमध्ये होणार आहे. या पहिल्या टप्प्यात अण्णा उत्तर भारतात दौरा करणार आहेत. यामध्ये लोकपाल, राईट टू रिजेक्ट आणि राईट टू रिकॉल या मागण्यांसाठी जनजागृती करणार आहेत. या दौर्‍यातली पहिली सभा जालियानवाला बागमध्ये होणार आहे. दुष्काळाच्या झळा सोसणार्‍या सर्वसामान्य जनतेला आपल्या व्यथा मांडण्यासाठी राळेगणसिद्धीच्या काही युवकांनी 'युथ फॉर चेंज' ची स्थापना केली आहे. याचं उद्धघाटन जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते करण्यात आले.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 27, 2013 09:50 AM IST

31 मार्चपासून अण्णा हजारेंच्या देशव्यापी दौरा

27 मार्च

राळेगणसिद्धी : जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे 31 मार्च ते 18 एप्रिल या दरम्यान देशव्यापी दौरा करणार आहेत. अण्णांची या जनतंत्र यात्रेची सुरवात पंजाबमधल्या अमृतसरमधून होणार आहे. 17 एप्रिलला या पहिल्या टप्याची शेवटची सभा हरिद्वारमध्ये होणार आहे. या पहिल्या टप्प्यात अण्णा उत्तर भारतात दौरा करणार आहेत. यामध्ये लोकपाल, राईट टू रिजेक्ट आणि राईट टू रिकॉल या मागण्यांसाठी जनजागृती करणार आहेत. या दौर्‍यातली पहिली सभा जालियानवाला बागमध्ये होणार आहे. दुष्काळाच्या झळा सोसणार्‍या सर्वसामान्य जनतेला आपल्या व्यथा मांडण्यासाठी राळेगणसिद्धीच्या काही युवकांनी 'युथ फॉर चेंज' ची स्थापना केली आहे. याचं उद्धघाटन जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते करण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 27, 2013 09:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close