S M L

भागवतांकडून अखिलेश यादवांना 'प्रशस्तीपत्रक'

27 मार्चनागपूर : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या सरकारनं कुंभ मेळ्याचे उत्कृष्ट आयोजन केलं असं प्रशस्तीपत्रक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिलंय. अखिलेश यांचे वडील आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिह यादव यांनी भाजपचे जेष्ठ नेत लालकृष्ण अडवाणी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली होती. त्यामुळे कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीचे प्रसंग घडूनही मोहन भागवत यांनी अखिलेश यादव सरकारचे कौतुक केल्यानं अनेकांनी भुवया उंचावल्यात. राजकीय वर्तुळात हे नव्या समिकरणांची नांदी आहे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. कुंभमेळात प्रत्येक जण आपले दुकान घेवून येतो असंही मोहन भागवत म्हणाले. छायाचित्रकार शेखर सोनी यांच्या कुंभ मेळाव्यातील फोटोंच्या प्रदर्शनानिमित्त मोहन भागवत नागपूर येथे बोलत होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 27, 2013 10:04 AM IST

भागवतांकडून अखिलेश यादवांना 'प्रशस्तीपत्रक'

27 मार्च

नागपूर : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या सरकारनं कुंभ मेळ्याचे उत्कृष्ट आयोजन केलं असं प्रशस्तीपत्रक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिलंय. अखिलेश यांचे वडील आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिह यादव यांनी भाजपचे जेष्ठ नेत लालकृष्ण अडवाणी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली होती. त्यामुळे कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीचे प्रसंग घडूनही मोहन भागवत यांनी अखिलेश यादव सरकारचे कौतुक केल्यानं अनेकांनी भुवया उंचावल्यात. राजकीय वर्तुळात हे नव्या समिकरणांची नांदी आहे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. कुंभमेळात प्रत्येक जण आपले दुकान घेवून येतो असंही मोहन भागवत म्हणाले. छायाचित्रकार शेखर सोनी यांच्या कुंभ मेळाव्यातील फोटोंच्या प्रदर्शनानिमित्त मोहन भागवत नागपूर येथे बोलत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 27, 2013 10:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close