S M L

'पाठिंबा काढणार नाही पण निवडणुका नोव्हेंबरमध्ये'

29 मार्चनवी दिल्ली : यूपीए सरकारचा द्रमुकने पाठिंबा काढल्यानंतर 'सायकल'नेही बाहेर पडण्याची धडपड सुरू केलीय. सपाचे अध्यक्ष मुलायम सिंग यादव यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागा असे आदेश देत तिसर्‍या आघाडीचे संकेत देऊन एकच खळबळ उडवून दिला. मात्र पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी यूपीए सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त केला. पंतप्रधानांच्या वक्तव्यानंतर 24 तासांच्या आत यूपीए सरकाला पाठिंबा देणार्‍या समाजवादी पक्षाने ती शक्यता नाकारली आहे. लोकसभेच्या निवडणुका याच वर्षी नोव्हेंबरमध्ये होतील असं समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी भाकित वर्तवलंय. आयबीएन नेटवर्कशी बोलताना ते म्हणाले, काँग्रेस पक्ष बेभरवशाचा आणि संधिसाधू पक्ष असला. तरी आम्ही यूपीए सरकारला बाहेरून दिलेला पाठिंबा सध्या तरी काढणार नाही. पण काँग्रेस स्वतःहूनच नोव्हेंबरमध्ये निवडणुका जाहीर करेल अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. निवडणुकांचा प्रचार सगळ्याच पक्षांनी सुरू केलाय, असा दावाही त्यांनी केला. निवडणुकांनंतर तिसर्‍या आघाडीचं सरकार येऊ शकतं पण आघाडीचा विचार निवडणुकांनंतरच होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 29, 2013 09:28 AM IST

'पाठिंबा काढणार नाही पण निवडणुका नोव्हेंबरमध्ये'

29 मार्च

नवी दिल्ली : यूपीए सरकारचा द्रमुकने पाठिंबा काढल्यानंतर 'सायकल'नेही बाहेर पडण्याची धडपड सुरू केलीय. सपाचे अध्यक्ष मुलायम सिंग यादव यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागा असे आदेश देत तिसर्‍या आघाडीचे संकेत देऊन एकच खळबळ उडवून दिला. मात्र पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी यूपीए सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त केला. पंतप्रधानांच्या वक्तव्यानंतर 24 तासांच्या आत यूपीए सरकाला पाठिंबा देणार्‍या समाजवादी पक्षाने ती शक्यता नाकारली आहे. लोकसभेच्या निवडणुका याच वर्षी नोव्हेंबरमध्ये होतील असं समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी भाकित वर्तवलंय. आयबीएन नेटवर्कशी बोलताना ते म्हणाले, काँग्रेस पक्ष बेभरवशाचा आणि संधिसाधू पक्ष असला. तरी आम्ही यूपीए सरकारला बाहेरून दिलेला पाठिंबा सध्या तरी काढणार नाही. पण काँग्रेस स्वतःहूनच नोव्हेंबरमध्ये निवडणुका जाहीर करेल अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. निवडणुकांचा प्रचार सगळ्याच पक्षांनी सुरू केलाय, असा दावाही त्यांनी केला. निवडणुकांनंतर तिसर्‍या आघाडीचं सरकार येऊ शकतं पण आघाडीचा विचार निवडणुकांनंतरच होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 29, 2013 09:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close