S M L

उत्तर कोरियाची अमेरिकेवर क्षेपणास्त्र डागण्याची धमकी

29 मार्चउत्तर कोरियानं अमेरिकेवर आणि तिच्या लष्करी तळावर क्षेपणास्त्र डागण्याची धमकी दिली आहे. अमेरिकेने लष्करी कवायतींसाठी काल दक्षिण कोरियाकडे छुपे बाँबर्स पाठवल्यानंतर संतापलेल्या उत्तर कोरियाने हा इशारा दिलाय. त्याचवेळी उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जाँग युन यांनी सर्व रॉकेट डागण्यास तयार ठेवण्याचा लेखी आदेश दिलाय. तसंच किम यांनी लष्करी अधिकार्‍यांची बैठकही घेतली. बुधवारी उ. कोरियानं दक्षिण कोरियाबरोबरची शेवटची हॉटलाईनही तोडल्यानंतर दोन्ही देशांमधल्या वाढत्या तणावाकडं सगळ्याचं लक्ष गेलंय. गेल्याच महिन्यात उ. कोरियाने अण्वस्त्र चाचणी केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 29, 2013 04:23 PM IST

उत्तर कोरियाची अमेरिकेवर क्षेपणास्त्र डागण्याची धमकी

29 मार्च

उत्तर कोरियानं अमेरिकेवर आणि तिच्या लष्करी तळावर क्षेपणास्त्र डागण्याची धमकी दिली आहे. अमेरिकेने लष्करी कवायतींसाठी काल दक्षिण कोरियाकडे छुपे बाँबर्स पाठवल्यानंतर संतापलेल्या उत्तर कोरियाने हा इशारा दिलाय. त्याचवेळी उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जाँग युन यांनी सर्व रॉकेट डागण्यास तयार ठेवण्याचा लेखी आदेश दिलाय. तसंच किम यांनी लष्करी अधिकार्‍यांची बैठकही घेतली. बुधवारी उ. कोरियानं दक्षिण कोरियाबरोबरची शेवटची हॉटलाईनही तोडल्यानंतर दोन्ही देशांमधल्या वाढत्या तणावाकडं सगळ्याचं लक्ष गेलंय. गेल्याच महिन्यात उ. कोरियाने अण्वस्त्र चाचणी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 29, 2013 04:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close