S M L

मायावतींनी विरोधकांचे आरोप फेटाळले

25 डिसेंबर उत्तरप्रदेशबहुजन समाज पक्षाला निधी न दिल्यामुळेच मनोज गुप्ताची हत्या केली गेली असा आरोप उत्तरप्रदेशातील विरोधी पक्षांनी केला होता. पण मुख्यमंत्री मायावती यांनी हा आरोप फेटाळला आहे. या प्रकरणासंबंधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. ठेकेदारी प्रकरणातून ही हत्या झाली असावी पण याचा संबंध माझ्या वाढदिवसाच्या निधीशी जोडणं ही शर्मेची गोष्ट असल्याचं त्या पुढे म्हणाल्या. उत्तरप्रदेशमध्ये शेखर तिवारी या सत्ताधारी बहुजन समाज पक्षाच्या आमदाराने आपल्या साथीदारांसोबत पीडब्ल्यूडी इंजिनिअर मनोज गुप्ताच्या घरात घुसून त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीतच मनोजचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृत्यूदेह पोलीस स्टेशनसमोर टाकण्यात आला होता. बसपाला निधी द्यायला नकार दिल्यानंच मनोजला मारल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. विरोधकांच्या वाढत्या दबावामुळे उत्तरप्रदेश सरकारने मनोज गुप्ताच्या हत्येच्या चौकशीचे आदेश दिले. दरम्यान शेखर तिवारीला अटक केली असून त्याला 7जानेवारीपर्यत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.मनोज गुप्ताच्या हत्या प्रकरणावरून समाजवादी पक्षाने उत्तरप्रदेश बंदचं आवाहन केलं होतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 25, 2008 10:05 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 25, 2008 10:05 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close