S M L

नक्षलवाद्यांवर आकाशातून 'नजर'

30 मार्चगडचिरोली : नक्षलवाद्यांच्या विरोधात केंद्र सरकारने आता आपली मोहिम अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतलाय. या मोहिमेअंतर्गत आता नक्षलवाद्यांवर हेलिकॉप्टरद्वारे सतत टेहळणी करण्यात येणार आहे. गडचिरोलीसह छत्तीसगड, आंध्रप्रदेश, ओरिसा आणि झारखंड या राज्यांमध्ये माओवाद्यांच्या कारवाया मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. उल्लेखनीय म्हणजे या सगळ्या राज्यातल्या नक्षल प्रभावित परिसर एकमेकाला लागून असल्यानं या राज्याच्या सीमा माओवाद्यांसाठी फायदेशीर ठरले आहेत. महाराष्ट्रासह या राज्यांच्या सीमा एकमेकांना लागूनच असल्यानं एका राज्यात कारवाया केल्यानंतर त्यांना सहज बाजूच्या राज्यात सुरक्षित जाता येत होतं. माओवाद्यांची ही रणनिती मोडून काढण्यासाठीच ही हवाई मोहिम आखण्यात आली आहे. सध्या गडचिरोली पोलिसांसाठी राज्य सरकारनं महिन्याला सव्वाकोटी रूपये भाडं देऊन एक हेलिकॉप्टर भाड्यानं घेतलं आहे. केंद्र सरकारनं आंध्रप्रदेशच्या ग्रेहाऊंड या नक्षलविरोधी पथकाला हेलिकॉप्टर दिलंय. या हेलिकॉप्टरनं तीन राज्यांच्या सीमेवर गस्तही सुरू केली आहे. घनदाट जंगलांमुळे अनेकदा सुरक्षा दलांना लढण्यास अडथळा येतो. यामुळे येत्या काळात पाच राज्यांच्या नक्षल प्रभावित परिसरावर हवाई मोहीम तीव्र करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. यासाठी नागपूर केंद्रस्थानी असेल. यासाठी तात्पुरत्या स्वरूपाचं हेलिपॅडही चालणार आहे. या हेलिकॉप्टरमध्ये अत्याधुनिक ऑटोपायलट आणि रात्रीच्या अंधारात दिसू शकतील अत्याधुनिक उपकरणंही आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 30, 2013 11:08 AM IST

नक्षलवाद्यांवर आकाशातून 'नजर'

30 मार्च

गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या विरोधात केंद्र सरकारने आता आपली मोहिम अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतलाय. या मोहिमेअंतर्गत आता नक्षलवाद्यांवर हेलिकॉप्टरद्वारे सतत टेहळणी करण्यात येणार आहे. गडचिरोलीसह छत्तीसगड, आंध्रप्रदेश, ओरिसा आणि झारखंड या राज्यांमध्ये माओवाद्यांच्या कारवाया मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.

उल्लेखनीय म्हणजे या सगळ्या राज्यातल्या नक्षल प्रभावित परिसर एकमेकाला लागून असल्यानं या राज्याच्या सीमा माओवाद्यांसाठी फायदेशीर ठरले आहेत. महाराष्ट्रासह या राज्यांच्या सीमा एकमेकांना लागूनच असल्यानं एका राज्यात कारवाया केल्यानंतर त्यांना सहज बाजूच्या राज्यात सुरक्षित जाता येत होतं. माओवाद्यांची ही रणनिती मोडून काढण्यासाठीच ही हवाई मोहिम आखण्यात आली आहे. सध्या गडचिरोली पोलिसांसाठी राज्य सरकारनं महिन्याला सव्वाकोटी रूपये भाडं देऊन एक हेलिकॉप्टर भाड्यानं घेतलं आहे. केंद्र सरकारनं आंध्रप्रदेशच्या ग्रेहाऊंड या नक्षलविरोधी पथकाला हेलिकॉप्टर दिलंय.

या हेलिकॉप्टरनं तीन राज्यांच्या सीमेवर गस्तही सुरू केली आहे. घनदाट जंगलांमुळे अनेकदा सुरक्षा दलांना लढण्यास अडथळा येतो. यामुळे येत्या काळात पाच राज्यांच्या नक्षल प्रभावित परिसरावर हवाई मोहीम तीव्र करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. यासाठी नागपूर केंद्रस्थानी असेल. यासाठी तात्पुरत्या स्वरूपाचं हेलिपॅडही चालणार आहे. या हेलिकॉप्टरमध्ये अत्याधुनिक ऑटोपायलट आणि रात्रीच्या अंधारात दिसू शकतील अत्याधुनिक उपकरणंही आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 30, 2013 11:08 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close