S M L

प्राध्यापकांच्या बहिष्काराचा 'पेपर' दिल्लीत सुटणार ?

30 मार्च मुंबई : गेल्या 53 दिवसांपासून बहिष्काराची 'मशाल' पेटती ठेवून विद्यार्थ्यांना चटके देण्यार्‍या आडमुठ्या प्राध्यापकांचा 'पेपर' आता केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार तपासणार आहे. प्राध्यापकांच्या बहिष्कारावर तोडगा काढण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. आज संध्याकाळी शरद पवार आणि उच्च शिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्यात एक बैठक पार पडली. या बैठकीत प्राध्यापक संपावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी दिल्लीत आणखी एक बैठक होणार असून शरद पवार मनुष्यबळ विकास मंत्री पल्लम राजू यांची भेट घेणार आहे. प्राध्यापकांचे थकीत वेतनासाठी 1,500 कोटींची मागणी केंद्राकडे करणार आहे. राज्य सरकारने थकीत वेतनासाठी 1,500 कोटींची घोषणा केली होती मात्र तिला केंद्राची मंजुरी नसल्यामुळे प्राध्यापकांचा संप चिघळला होता. विविध मागण्यासाठी 4 फेब्रुवारीपासून सिनिअर कॉलेज आणि ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांनी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकलाय. आज या बहिष्काराचा 54 वा दिवस उजाडला आहे. मात्र यावर कोणताही तोडगा निघू न शकल्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होतं आहे. अनेक विद्यापीठातील नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहे. मध्यंतरी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांच्या बरोबर झालेल्या बैठकीत प्राध्यापकांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. यामध्ये चालू वर्षांपासून बिगर नेट-सेट आणि पीएचडीधारकांना नियमित करण्यात आले. त्याचबरोबर प्राध्यापकांचे थकीत वेतन देण्यासाठी 1,500 कोटींची घोषणा करण्यात आली. या घोषणेनंतर प्राध्यापकांना बहिष्कार मागे घेण्याची विनंती टोपे यांनी केली होती. मात्र प्राध्यापक संघटनेनं 1991 पासून बिगर नेट-सेट आणि पीएचडी धारकांना नियमित करावे अशी मागणी करत बहिष्कार मागे न घेण्याची भूमिका घेतली. पण सरकारने यावर कोणतेच उत्तर न दिल्यामुळे बहिष्कार चिघळला. यानंतर ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांनी बहिष्कार मागे घेऊन बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा दिला. मात्र सिनिअर्स कॉलेजच्या प्राध्यापकांनी बहिष्कार कायम ठेवला. अखेरीस केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी पुढाकार घेऊन बहिष्कारावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे. दिल्लीत सोमवारी प्राध्यापकांच्या थकीत वेतनासाठी मागणी केली जाणार असून एक बैठकीही होणार आहे. त्यामुळे आता प्राध्यापकांच्या बहिष्कारावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.सीनिअर कॉलेजच्या शिक्षकांच्या मागण्या1) 1990 ते 2000 दरम्यान, नियुक्त प्राध्यापकांना कायम करावं2) नियुक्तीच्या तारखेपासून वेतन, पद निश्चिती करावी3) नेट, सेट मुक्त शिक्षकांना नवीन वेतनश्रेणी देण्यासाठी राज्य सरकारने कार्यवाही पूर्ण करावी4) HRD विभागाने 31 डिसेंबर 2008 जाहीर केलेली वेतन पुर्नरचना लागू करावी5) समाजकार्य शिकवणाऱ्या शिक्षकांना 1-04-2011 ते 31-03-2012 या काळातील थकबाकीची रक्कम अदा करावी6) सर्व विनाअनुदानित अभियांत्रिकी शिक्षकांना सहाव्या वेतन आयोगाचा लाभ द्यावा7) अनुदानित अशासकीय शारीरिक शिक्षण कॉलेजच्या शिक्षकांना सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या8) सीनिअर कॉलेजच्या शिक्षकांना पाचव्या वेतन आयोगानुसार वेतनवाढीचे लाभ द्यावेत9) पीएचडी, आणि एम फिल धारक शिक्षकांना HRD विभाग आणि UGC च्या आयोगानुसार वेतनवाढ देण्यात यावी10) केंद्राच्या निर्देशानुसार सेवानिवृत्तीचं वय 60 वरुन 65 करावं11) अकृषी विद्यापीठ आणि संलग्न कॉलेजमधील शिक्षकांचे पगार दर महिन्याच्या 1 तारखेला अदा करावेत12) महागाई भत्त्यातील वाढ विद्यापीठ आणि कॉलेजच्या शिक्षकांना लागू करावी13) विद्यापीठे आणि कॉलेजमध्ये कंत्राटी पद्धतीने नेमणूक केलेल्या सर्व शिक्षकांच्या सेवा नियमित कराव्यात

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 30, 2013 01:26 PM IST

प्राध्यापकांच्या बहिष्काराचा 'पेपर' दिल्लीत सुटणार ?

30 मार्च

मुंबई : गेल्या 53 दिवसांपासून बहिष्काराची 'मशाल' पेटती ठेवून विद्यार्थ्यांना चटके देण्यार्‍या आडमुठ्या प्राध्यापकांचा 'पेपर' आता केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार तपासणार आहे. प्राध्यापकांच्या बहिष्कारावर तोडगा काढण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. आज संध्याकाळी शरद पवार आणि उच्च शिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्यात एक बैठक पार पडली. या बैठकीत प्राध्यापक संपावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी दिल्लीत आणखी एक बैठक होणार असून शरद पवार मनुष्यबळ विकास मंत्री पल्लम राजू यांची भेट घेणार आहे. प्राध्यापकांचे थकीत वेतनासाठी 1,500 कोटींची मागणी केंद्राकडे करणार आहे. राज्य सरकारने थकीत वेतनासाठी 1,500 कोटींची घोषणा केली होती मात्र तिला केंद्राची मंजुरी नसल्यामुळे प्राध्यापकांचा संप चिघळला होता.

विविध मागण्यासाठी 4 फेब्रुवारीपासून सिनिअर कॉलेज आणि ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांनी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकलाय. आज या बहिष्काराचा 54 वा दिवस उजाडला आहे. मात्र यावर कोणताही तोडगा निघू न शकल्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होतं आहे. अनेक विद्यापीठातील नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहे. मध्यंतरी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांच्या बरोबर झालेल्या बैठकीत प्राध्यापकांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. यामध्ये चालू वर्षांपासून बिगर नेट-सेट आणि पीएचडीधारकांना नियमित करण्यात आले. त्याचबरोबर प्राध्यापकांचे थकीत वेतन देण्यासाठी 1,500 कोटींची घोषणा करण्यात आली. या घोषणेनंतर प्राध्यापकांना बहिष्कार मागे घेण्याची विनंती टोपे यांनी केली होती. मात्र प्राध्यापक संघटनेनं 1991 पासून बिगर नेट-सेट आणि पीएचडी धारकांना नियमित करावे अशी मागणी करत बहिष्कार मागे न घेण्याची भूमिका घेतली. पण सरकारने यावर कोणतेच उत्तर न दिल्यामुळे बहिष्कार चिघळला. यानंतर ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांनी बहिष्कार मागे घेऊन बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा दिला. मात्र सिनिअर्स कॉलेजच्या प्राध्यापकांनी बहिष्कार कायम ठेवला. अखेरीस केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी पुढाकार घेऊन बहिष्कारावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे. दिल्लीत सोमवारी प्राध्यापकांच्या थकीत वेतनासाठी मागणी केली जाणार असून एक बैठकीही होणार आहे. त्यामुळे आता प्राध्यापकांच्या बहिष्कारावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.

सीनिअर कॉलेजच्या शिक्षकांच्या मागण्या

1) 1990 ते 2000 दरम्यान, नियुक्त प्राध्यापकांना कायम करावं2) नियुक्तीच्या तारखेपासून वेतन, पद निश्चिती करावी3) नेट, सेट मुक्त शिक्षकांना नवीन वेतनश्रेणी देण्यासाठी राज्य सरकारने कार्यवाही पूर्ण करावी4) HRD विभागाने 31 डिसेंबर 2008 जाहीर केलेली वेतन पुर्नरचना लागू करावी5) समाजकार्य शिकवणाऱ्या शिक्षकांना 1-04-2011 ते 31-03-2012 या काळातील थकबाकीची रक्कम अदा करावी6) सर्व विनाअनुदानित अभियांत्रिकी शिक्षकांना सहाव्या वेतन आयोगाचा लाभ द्यावा7) अनुदानित अशासकीय शारीरिक शिक्षण कॉलेजच्या शिक्षकांना सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या8) सीनिअर कॉलेजच्या शिक्षकांना पाचव्या वेतन आयोगानुसार वेतनवाढीचे लाभ द्यावेत9) पीएचडी, आणि एम फिल धारक शिक्षकांना HRD विभाग आणि UGC च्या आयोगानुसार वेतनवाढ देण्यात यावी10) केंद्राच्या निर्देशानुसार सेवानिवृत्तीचं वय 60 वरुन 65 करावं11) अकृषी विद्यापीठ आणि संलग्न कॉलेजमधील शिक्षकांचे पगार दर महिन्याच्या 1 तारखेला अदा करावेत12) महागाई भत्त्यातील वाढ विद्यापीठ आणि कॉलेजच्या शिक्षकांना लागू करावी13) विद्यापीठे आणि कॉलेजमध्ये कंत्राटी पद्धतीने नेमणूक केलेल्या सर्व शिक्षकांच्या सेवा नियमित कराव्यात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 30, 2013 01:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close