S M L

पटपडताळणीमध्ये दोषी शाळांची मान्यता रद्द

01 एप्रिल 13पुणे : राज्यात झालेल्या पटपडताळणी मध्ये दोषी आढळलेल्या शाळांची मान्यता रद्द करण्याची प्रक्रीया सरकारनं सुरू केली आहे. सरकारने मे 2012 मध्ये काढलेल्या आदेशांनुसार ही कारवाई करण्यात येतेय. राज्याचे शिक्षण संचालक महावीर माने यांनी ही माहिती दिली आहे. या आदेशानुसार शाळांना नोटीस बजावण्याची कारवाई सुरु झालीय. त्यानंतर सुनावणी होऊन मान्यता रद्द करण्याची प्रक्रीया केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. 2011- 12 मध्ये राज्यात शाळांची पटपडताळणी करण्यात आली होती. त्यामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. त्यानुसार ही कारवाई करण्यात येत आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्यातील अनधिकृत शाळांची माहिती पुणे विभागाच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयाला मिळाल्यानंतर त्यांना चौकशी करून जिल्ह्यातील 61 शाळा अनधिकृत ठरवल्यात. या शाळा एप्रिलमध्ये चालू रााहिल्यास शाळेला एक लाख रूपये दंड आणि त्यानंतर शाळेला मान्यता मिळेपर्यंत प्रत्येक दिवशी 10 हजार रूपये दंड आकारण्याचे आदेश शिक्षणाधिकार्‍यांना दिले आहेत. पण स्थानिक अधिकार्‍यांच्या आशिर्वादामुळे आजही या शाळा सुरूच आहेत. जिल्ह्यात सर्वात जास्त अनधिकृत शाळा कृषीमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या राहता मतदारसंघ आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर मतदार संघात असल्याचं स्पष्ट झालंय. 2011- 12 मध्ये राज्य सरकारने राज्यभरातल्या शाळांची पटपडताळणी केली होती. त्यात 10.16 टक्के बोगस विद्यार्थी आढळले होते. 20 ते 50 टक्के अनुपस्थिती गैरहजेरी असणार्‍या शाळांतल्या शिक्षक आणि कर्मचार्‍यांना दुसरीकडे पाठवण्यात येणार आहे. 50 टक्यांपेक्षा जास्त गैरहजेरी असलेल्या शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. तसेच पटपडताळणीचे खोटे अहवाल देणार्‍या अधिकारर्‍यांवर कारवाई केली जाणार आहे. मागिल वर्षी मोठा गाजावाजा करत राज्यभरात जिल्हा परिषदेच्या शाळेत पटपडताळणी मोहिम राबवण्यात आली. मात्र या मोहिमेत अनेक गैर प्रकार उघडकीस आले.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 1, 2013 09:25 AM IST

पटपडताळणीमध्ये दोषी शाळांची मान्यता रद्द

01 एप्रिल 13

पुणे : राज्यात झालेल्या पटपडताळणी मध्ये दोषी आढळलेल्या शाळांची मान्यता रद्द करण्याची प्रक्रीया सरकारनं सुरू केली आहे. सरकारने मे 2012 मध्ये काढलेल्या आदेशांनुसार ही कारवाई करण्यात येतेय. राज्याचे शिक्षण संचालक महावीर माने यांनी ही माहिती दिली आहे. या आदेशानुसार शाळांना नोटीस बजावण्याची कारवाई सुरु झालीय. त्यानंतर सुनावणी होऊन मान्यता रद्द करण्याची प्रक्रीया केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

2011- 12 मध्ये राज्यात शाळांची पटपडताळणी करण्यात आली होती. त्यामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. त्यानुसार ही कारवाई करण्यात येत आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्यातील अनधिकृत शाळांची माहिती पुणे विभागाच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयाला मिळाल्यानंतर त्यांना चौकशी करून जिल्ह्यातील 61 शाळा अनधिकृत ठरवल्यात. या शाळा एप्रिलमध्ये चालू रााहिल्यास शाळेला एक लाख रूपये दंड आणि त्यानंतर शाळेला मान्यता मिळेपर्यंत प्रत्येक दिवशी 10 हजार रूपये दंड आकारण्याचे आदेश शिक्षणाधिकार्‍यांना दिले आहेत. पण स्थानिक अधिकार्‍यांच्या आशिर्वादामुळे आजही या शाळा सुरूच आहेत.

जिल्ह्यात सर्वात जास्त अनधिकृत शाळा कृषीमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या राहता मतदारसंघ आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर मतदार संघात असल्याचं स्पष्ट झालंय. 2011- 12 मध्ये राज्य सरकारने राज्यभरातल्या शाळांची पटपडताळणी केली होती. त्यात 10.16 टक्के बोगस विद्यार्थी आढळले होते. 20 ते 50 टक्के अनुपस्थिती गैरहजेरी असणार्‍या शाळांतल्या शिक्षक आणि कर्मचार्‍यांना दुसरीकडे पाठवण्यात येणार आहे. 50 टक्यांपेक्षा जास्त गैरहजेरी असलेल्या शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. तसेच पटपडताळणीचे खोटे अहवाल देणार्‍या अधिकारर्‍यांवर कारवाई केली जाणार आहे. मागिल वर्षी मोठा गाजावाजा करत राज्यभरात जिल्हा परिषदेच्या शाळेत पटपडताळणी मोहिम राबवण्यात आली. मात्र या मोहिमेत अनेक गैर प्रकार उघडकीस आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 1, 2013 09:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close