S M L

शिवसेनेच्या सर्व्हेमुळे भाजप संभ्रमात

25 डिसेंबर नागपूरआशिष जाधव येत्या 4 महिन्यात लोकसभा तर 9 महिन्यांनी विधानसभा निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केल्यास काय होईल याची चाचपणी शिवसेनेनं सुरू केली आहे. याशिवाय भाजपशी फारकत घेतल्याचा किती परिणाम होईल याचाही सर्व्हे शिवसेनेनं केला आहे. शिवसेनेनं असे सर्व्हे केल्यानं राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले आहेत.1984 पासून शिवसेना- भाजपची राजकीय दोस्ती आहे. पश्चिम बंगालमधील डाव्यांच्या युतीनंतर ही देशातली सर्वात जुनी राजकीय आघाडी मानली जाते.मात्र आता या मित्र पक्षांमध्ये फायदा तोट्याची गणितं सुरू झाली आहेत. शिवसेनेनं नुकतेच 3 वेगवेगळे सर्व्हे केले. या सर्व्हेच काम खाजगी संस्थांना हे काम देण्यात आलं होतं. तीन सर्व्हेनुसार पहिला सर्व्हे शिवसेनेनं भाजपपासून फारकत घेतली तर मतांच्या गणितावर काय परिणाम होईल याबाबतचा आहे. तर दुसरा सर्व्हे शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी केली तर किती मतदारसंघात फायदा होईल असा आहे. तसंच तिसरा सर्व्हे शिवसेनेनं मायावतींच्या बीएसपीशी आघाडी केली तर काय राजकीय फायदा- तोटा होईल असा आहे.पण या सर्व्हेचे निष्कर्ष काय आहेत याबाबत मात्र शिवसेनेतर्फे कोणीही जाहीर बोलायला तयार नाही. काहीही असो पण या सर्व्हेमुळे भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.भाजपाची ताकद राज्यात कमी झाली आहे. अशावेळेस भाजपाच्या साथीनं पुन्हा सत्तेवर येऊ का याबाबत शिवसेनेत शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच शिवसेनेत भाजपाशी फारकत घेण्याबाबत चर्चा सुरू आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 25, 2008 11:59 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 25, 2008 11:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close