S M L

'भंडारा प्रकरणाचं मार्केटिंग केलं'

01 एप्रिलमुंबई : दिल्लीतील सामुहिक बलात्कार घटनेमुळे संपूर्ण देशात जनक्षोम उसळला होता. या घटनेला काही महिने उलटत नाही तोच भंडारा जिल्ह्यात तीन अल्पवयीन सख्या बहिणीवर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याची माणुसकीला काळीमा फासणार घडना घडली. मात्र या घटनेचे दोन वेगवेगळे पोस्टमार्टम रिपोर्टमुळे प्रकरणाला वेगळे वळणं मिळाले. अखेर या प्रकरणाची सखोल चौकशीसाठी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे याबाबत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज विधानसभेत घोषणा केली. पण याचवेळी त्यांनी एक धक्कादायक विधान करून वाद निर्माण केलाय. भंडार्‍यातल्या घटनेचं मार्केटिंग करण्यात आल्याचा आरोप आर. आर. पाटील यांनी केला. आतापर्यंत 10 व्हीआयपी लोकांनी घटनास्थळाला भेट दिली घटनास्थळाला भेट देण्यासाठी बाहेरून आंदोलक आणले, असं निवेदन त्यांनी केलंय. दुसरीकडे तपासात कोणत्याही प्रकारची हयगय केली जाणार नाही, मुलींचा मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट होईपर्यंत तपास थांबवणार नाही असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे. या प्रकरणी आता पर्यंत 300 पेक्षा जास्त लोकांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या आहेत तर पोस्टमॉर्टेमनुसार 376 आणि 302 अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 1, 2013 01:44 PM IST

'भंडारा प्रकरणाचं मार्केटिंग केलं'

01 एप्रिल

मुंबई : दिल्लीतील सामुहिक बलात्कार घटनेमुळे संपूर्ण देशात जनक्षोम उसळला होता. या घटनेला काही महिने उलटत नाही तोच भंडारा जिल्ह्यात तीन अल्पवयीन सख्या बहिणीवर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याची माणुसकीला काळीमा फासणार घडना घडली. मात्र या घटनेचे दोन वेगवेगळे पोस्टमार्टम रिपोर्टमुळे प्रकरणाला वेगळे वळणं मिळाले. अखेर या प्रकरणाची सखोल चौकशीसाठी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे याबाबत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज विधानसभेत घोषणा केली. पण याचवेळी त्यांनी एक धक्कादायक विधान करून वाद निर्माण केलाय. भंडार्‍यातल्या घटनेचं मार्केटिंग करण्यात आल्याचा आरोप आर. आर. पाटील यांनी केला. आतापर्यंत 10 व्हीआयपी लोकांनी घटनास्थळाला भेट दिली घटनास्थळाला भेट देण्यासाठी बाहेरून आंदोलक आणले, असं निवेदन त्यांनी केलंय. दुसरीकडे तपासात कोणत्याही प्रकारची हयगय केली जाणार नाही, मुलींचा मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट होईपर्यंत तपास थांबवणार नाही असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे. या प्रकरणी आता पर्यंत 300 पेक्षा जास्त लोकांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या आहेत तर पोस्टमॉर्टेमनुसार 376 आणि 302 अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 1, 2013 01:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close