S M L

बाबरी मशीद प्रकरणी अडवाणी येणार अडचणीत ?

02 एप्रिलनवी दिल्ली : बाबरी मशीद प्रकरणी भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या अडचणी वाढू शकतात. त्याच बरोबर केंद्र सरकार आणि सीबीआयही अडचणीत आलं आहे. बाबरी मशीद पाडण्याचा कट रचला. या आरोपातून अलाहाबाद हायकोर्टाने अडवाणींना निर्दोष मुक्त केलं होतं. अलाहाबाद हायकोर्टाने लालकृष्ण अडवाणी यांच्यावरचे आरोप रद्द केले होते. त्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करायला इतका उशीर का लागला याबद्दल सुप्रीम कोर्टाने सॉलिसिटर जनरलकडून स्पष्टीकरण मागितलंय. कोर्टाने या उशिराबद्दलचं स्पष्टीकरण 16 एप्रिलच्या आधी देण्याचे आदेश दिले आहेत. बाबरी मशीद पाडण्याच्या कटात सहभागी असण्याच्या आरोपातून अलाहाबाद हायकोर्टाने अडवाणींची मुक्तता केली होती. मात्र आता सुप्रीम कोर्टाने स्पष्टीकरण मागितल्यामुळे अडवाणी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 2, 2013 10:22 AM IST

बाबरी मशीद प्रकरणी अडवाणी येणार अडचणीत ?

02 एप्रिल

नवी दिल्ली : बाबरी मशीद प्रकरणी भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या अडचणी वाढू शकतात. त्याच बरोबर केंद्र सरकार आणि सीबीआयही अडचणीत आलं आहे. बाबरी मशीद पाडण्याचा कट रचला. या आरोपातून अलाहाबाद हायकोर्टाने अडवाणींना निर्दोष मुक्त केलं होतं. अलाहाबाद हायकोर्टाने लालकृष्ण अडवाणी यांच्यावरचे आरोप रद्द केले होते. त्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करायला इतका उशीर का लागला याबद्दल सुप्रीम कोर्टाने सॉलिसिटर जनरलकडून स्पष्टीकरण मागितलंय. कोर्टाने या उशिराबद्दलचं स्पष्टीकरण 16 एप्रिलच्या आधी देण्याचे आदेश दिले आहेत. बाबरी मशीद पाडण्याच्या कटात सहभागी असण्याच्या आरोपातून अलाहाबाद हायकोर्टाने अडवाणींची मुक्तता केली होती. मात्र आता सुप्रीम कोर्टाने स्पष्टीकरण मागितल्यामुळे अडवाणी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 2, 2013 10:22 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close