S M L

काँग्रेसमध्ये पंतप्रधानपदावरून रस्सीखेच

02 एप्रिलनवी दिल्ली : भाजपमधून पंतप्रधानपदासाठी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. पण, काँग्रेसचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल, यावर पक्षात दोन वेगवेगळी मत दिसत आहेत. मनमोहन सिंग पंतप्रधान आणि सोनिया गांधी या काँग्रेस अध्यक्ष हा सत्तेचा फॉर्म्युला येत्या निवडणुकीनंतरही कायम राहू शकतो असं अत्यंत महत्त्वाचं विधान आज काँग्रेसकडून करण्यात आलं आहे. काँग्रेस सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी आज नवी दिल्लीमध्ये हे विधान केलं आहे. सत्तेची दोन केंद्रं करणारा हा फॉर्म्युला पक्षाचं खूप नुकसान करतोय असं वक्तव्य काँग्रेसचे आणखी एक सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी नुकतच केलं होतं. त्यानंतर द्विवेदी यांनी आज काँग्रेसची ही अधिकृत भूमिका जाहीर केली आहे. काही दिवसांपूर्वी एका इंग्रजी पेपरला मुलाखत देताना दोन सत्ताकेंद्रांमुळे निर्णय प्रक्रीयेवर परिणाम होतो. यामुळे पक्षाचंही नुकसान होतं असं दिग्विजय सिंगांचं म्हणणं आहे. त्यामुळे येत्या काळात राहुल गांधी यांना पंतप्रधान पदासोबत काँग्रेस अध्यक्षपदंही सोपवलं जावं असं दिग्विजय यांना म्हणायचं आहे अशी चर्चा होती. त्याचवेळी काँग्रेस पक्षामध्ये जी सध्या मनमोहन सिंग सरकारबद्दल नाराजी आहे त्याला दिग्विजय यांनी तोंड फोडलं असंही मानलं गेलं. दिग्विजय आज चंद्रपूरमध्ये होते. तिथेही त्यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाची प्रशंसा केली. यामुळे अखेर आज काँग्रेसकडून खुलासा करण्यात आला आहे. यावेळी बोलताना काँग्रेस महासचिव आणि सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे जनार्दन द्विवेदी यांनी हा सत्तेचा फॉर्म्युला अत्यंत यशस्वी ठरल्याचा दावा केला. त्याचवेळी येत्या काळात हा फॉर्मुला पुन्हा एकदा वापरला जाऊ शकतो असंही ते म्हणाले. 2014 ची निवडणूक कोणाच्या नेतृत्वाखाली लढवायची याचा निर्णय योग्य वेळी काँग्रेस पक्ष घेईल असंही द्विवेदी यांनी स्पष्ट केलं.दिग्विजय सिंग म्हणतात,पंतप्रधान आणि काँग्रेस अध्यक्ष पद अशा दोन सत्ताकेंद्रांमुळे निर्णय प्रक्रीयेवर परिणाम होतो. यामुळे पक्षाचंही नुकसान होत आहे. यानंतर पंतप्रधान आणि काँग्रेस अध्यक्ष ही दोन्ही पदं एकाच व्यक्तीकडे असणं योग्य ठरेल. जनार्दन द्विवेदी म्हणतात,काँग्रेस अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी आणि पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांच्यात जे संबंध आहेत, असं उदाहरण मिळत नाही. कदाचित भविष्यातही हीच स्थिती योग्य असेल.

आईबीएन लोकमत | Updated On: May 17, 2013 03:12 PM IST

काँग्रेसमध्ये पंतप्रधानपदावरून रस्सीखेच

02 एप्रिल

नवी दिल्ली : भाजपमधून पंतप्रधानपदासाठी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. पण, काँग्रेसचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल, यावर पक्षात दोन वेगवेगळी मत दिसत आहेत. मनमोहन सिंग पंतप्रधान आणि सोनिया गांधी या काँग्रेस अध्यक्ष हा सत्तेचा फॉर्म्युला येत्या निवडणुकीनंतरही कायम राहू शकतो असं अत्यंत महत्त्वाचं विधान आज काँग्रेसकडून करण्यात आलं आहे. काँग्रेस सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी आज नवी दिल्लीमध्ये हे विधान केलं आहे. सत्तेची दोन केंद्रं करणारा हा फॉर्म्युला पक्षाचं खूप नुकसान करतोय असं वक्तव्य काँग्रेसचे आणखी एक सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी नुकतच केलं होतं. त्यानंतर द्विवेदी यांनी आज काँग्रेसची ही अधिकृत भूमिका जाहीर केली आहे.

काही दिवसांपूर्वी एका इंग्रजी पेपरला मुलाखत देताना दोन सत्ताकेंद्रांमुळे निर्णय प्रक्रीयेवर परिणाम होतो. यामुळे पक्षाचंही नुकसान होतं असं दिग्विजय सिंगांचं म्हणणं आहे. त्यामुळे येत्या काळात राहुल गांधी यांना पंतप्रधान पदासोबत काँग्रेस अध्यक्षपदंही सोपवलं जावं असं दिग्विजय यांना म्हणायचं आहे अशी चर्चा होती. त्याचवेळी काँग्रेस पक्षामध्ये जी सध्या मनमोहन सिंग सरकारबद्दल नाराजी आहे त्याला दिग्विजय यांनी तोंड फोडलं असंही मानलं गेलं. दिग्विजय आज चंद्रपूरमध्ये होते. तिथेही त्यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाची प्रशंसा केली. यामुळे अखेर आज काँग्रेसकडून खुलासा करण्यात आला आहे. यावेळी बोलताना काँग्रेस महासचिव आणि सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे जनार्दन द्विवेदी यांनी हा सत्तेचा फॉर्म्युला अत्यंत यशस्वी ठरल्याचा दावा केला. त्याचवेळी येत्या काळात हा फॉर्मुला पुन्हा एकदा वापरला जाऊ शकतो असंही ते म्हणाले. 2014 ची निवडणूक कोणाच्या नेतृत्वाखाली लढवायची याचा निर्णय योग्य वेळी काँग्रेस पक्ष घेईल असंही द्विवेदी यांनी स्पष्ट केलं.दिग्विजय सिंग म्हणतात,पंतप्रधान आणि काँग्रेस अध्यक्ष पद अशा दोन सत्ताकेंद्रांमुळे निर्णय प्रक्रीयेवर परिणाम होतो. यामुळे पक्षाचंही नुकसान होत आहे. यानंतर पंतप्रधान आणि काँग्रेस अध्यक्ष ही दोन्ही पदं एकाच व्यक्तीकडे असणं योग्य ठरेल.

जनार्दन द्विवेदी म्हणतात,काँग्रेस अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी आणि पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांच्यात जे संबंध आहेत, असं उदाहरण मिळत नाही. कदाचित भविष्यातही हीच स्थिती योग्य असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 2, 2013 02:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close