S M L

हुश्श, MPSC ची परीक्षा पुढे ढकलली

04 एप्रिलमुंबई : MPSC च्या लाखो विद्यार्थ्यांच्या असंतोषापुढे सरकार अखेर झुकलंय. तीन दिवसांच्या गोंधळानंतर अखेर MPSC ची पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. 7 एप्रिल रोजी होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांची याबाबत चर्चा झाली. त्यानंतर विधानपरिषदेत परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा केली. परीक्षेची तारीख MPSC नंतर जाहीर करेल, असं त्यांनी सांगितलं. 12 मे रोजी MPSCची पूर्वपरीक्षा होऊ शकते अशी माहिती मिळतेय. सरकारच्या या निर्णयामुळे लाखो परीक्षार्थीना दिलासा मिळालाय. दरम्यान, उद्या 5 एप्रिल रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत फॉर्म भरण्याची मुभा देण्यात आली आहे. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत फॉर्म भरण्याची मुदत होती पण आत्तापर्यंत फक्त 1 लाख 86 हजार विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहेत. अजून दीड लाख विद्यार्थ्यांचं फॉर्म भरणं बाकी आहे. 2 तासात दीड लाख विद्यार्थी फॉर्म कसे भरणार? हा यक्ष प्रश्न उपस्थिती झाला होता. अखेरीस मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि MPSC च्या अध्यक्षांची बैठकीत उद्या पाच वाजेपर्यंतची डेडलाईन देण्यात आली आहे. मात्र MPSCच्या परीक्षेवरून सरकारमध्ये जाहीर मतभेद जाहीर झाले आहेत. मुख्यमंत्री यांनी परीक्षा वेळेवरच होणार असल्याचं बुधवारी स्पष्ट केलं होतं. पण उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात, परीक्षा आताच घेण्याचा हट्ट नको. या सगळ्या गोंधळात विद्यार्थ्यांचं हीत महत्वाचं असल्याच अजित पवार यांनी म्हटलं आहे. 'वेबसाईट सांभळणार्‍या कंपनीची चौकशी व्हावी'एमपीएससीची परीक्षा अखेर पुढे ढकलण्यात आली पण विद्यार्थ्याना या तीन दिवसात प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. त्यासोबत VAST इंडिया या कंपनीकडे एमपीएससीच्या ऑनलाईन फॉर्मची जबाबदारी होती. झालेल्या गोंधळाबाबत त्यांची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे. आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण MPSC चे अध्यक्ष सुधीर ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी या भोंगळ कारभाराविरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहेत. यावर पाच तारखेपर्यंत स्पष्टीकरण देण्याचे आदेश कोर्टाने एमपीएससी आणि राज्य सरकारला दिले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 4, 2013 09:53 AM IST

हुश्श, MPSC ची परीक्षा पुढे ढकलली

04 एप्रिल

मुंबई : MPSC च्या लाखो विद्यार्थ्यांच्या असंतोषापुढे सरकार अखेर झुकलंय. तीन दिवसांच्या गोंधळानंतर अखेर MPSC ची पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. 7 एप्रिल रोजी होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांची याबाबत चर्चा झाली. त्यानंतर विधानपरिषदेत परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा केली. परीक्षेची तारीख MPSC नंतर जाहीर करेल, असं त्यांनी सांगितलं. 12 मे रोजी MPSCची पूर्वपरीक्षा होऊ शकते अशी माहिती मिळतेय. सरकारच्या या निर्णयामुळे लाखो परीक्षार्थीना दिलासा मिळालाय.

दरम्यान, उद्या 5 एप्रिल रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत फॉर्म भरण्याची मुभा देण्यात आली आहे. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत फॉर्म भरण्याची मुदत होती पण आत्तापर्यंत फक्त 1 लाख 86 हजार विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहेत. अजून दीड लाख विद्यार्थ्यांचं फॉर्म भरणं बाकी आहे. 2 तासात दीड लाख विद्यार्थी फॉर्म कसे भरणार? हा यक्ष प्रश्न उपस्थिती झाला होता. अखेरीस मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि MPSC च्या अध्यक्षांची बैठकीत उद्या पाच वाजेपर्यंतची डेडलाईन देण्यात आली आहे. मात्र MPSCच्या परीक्षेवरून सरकारमध्ये जाहीर मतभेद जाहीर झाले आहेत. मुख्यमंत्री यांनी परीक्षा वेळेवरच होणार असल्याचं बुधवारी स्पष्ट केलं होतं. पण उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात, परीक्षा आताच घेण्याचा हट्ट नको. या सगळ्या गोंधळात विद्यार्थ्यांचं हीत महत्वाचं असल्याच अजित पवार यांनी म्हटलं आहे.

'वेबसाईट सांभळणार्‍या कंपनीची चौकशी व्हावी'

एमपीएससीची परीक्षा अखेर पुढे ढकलण्यात आली पण विद्यार्थ्याना या तीन दिवसात प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. त्यासोबत VAST इंडिया या कंपनीकडे एमपीएससीच्या ऑनलाईन फॉर्मची जबाबदारी होती. झालेल्या गोंधळाबाबत त्यांची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे. आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण MPSC चे अध्यक्ष सुधीर ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी या भोंगळ कारभाराविरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहेत. यावर पाच तारखेपर्यंत स्पष्टीकरण देण्याचे आदेश कोर्टाने एमपीएससी आणि राज्य सरकारला दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 4, 2013 09:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close