S M L

जनार्दन चांदूरकर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी

04 एप्रिलनवी दिल्ली : अखेर मुंबई काँग्रेसला अध्यक्ष मिळाले. माजी आमदार ऍडव्होकेट जनार्दन चांदूरकर यांची मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीची घोषणा आज नवी दिल्लीत करण्यात आली. माजी मुख्यमंत्री दिवंंगत विलासराव देशमुख यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे चांदूरकर मुंबईतले दलित नेते आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन चांदूरकर यांची निवड करण्यात आलीय. अध्यक्षपदाच्या शर्यतीत चांदूरकर यांनी चंद्रकांत हंडोरे, मधू चव्हाण आणि भाई जगताप यांना मागे पाडलं. चांदूरकर यांच्या नियुक्तीच्या निमित्तानं विलासराव देशमुख गट पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 4, 2013 11:01 AM IST

जनार्दन चांदूरकर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी

04 एप्रिल

नवी दिल्ली : अखेर मुंबई काँग्रेसला अध्यक्ष मिळाले. माजी आमदार ऍडव्होकेट जनार्दन चांदूरकर यांची मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीची घोषणा आज नवी दिल्लीत करण्यात आली. माजी मुख्यमंत्री दिवंंगत विलासराव देशमुख यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे चांदूरकर मुंबईतले दलित नेते आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन चांदूरकर यांची निवड करण्यात आलीय. अध्यक्षपदाच्या शर्यतीत चांदूरकर यांनी चंद्रकांत हंडोरे, मधू चव्हाण आणि भाई जगताप यांना मागे पाडलं. चांदूरकर यांच्या नियुक्तीच्या निमित्तानं विलासराव देशमुख गट पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 4, 2013 11:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close