S M L

पंतप्रधानपदाचा प्रश्नच गैरलागू -राहुल गांधी

04 एप्रिलभारतात प्रचंड सकारात्मक ऊर्जा आहे, मात्र तरुणांना पुढे येण्यासाठी पाठबळ दिलं पाहिजे. तसंच जनतेला आणि पर्यायानं देशाला पुढे जाण्यासाठी पायाभूत सोयींची गरज आहे, याकडेही त्यांनी उद्योजकांचं लक्ष वेधलं. भारताकडं प्रचंड गुणवंत मनुष्यबळ आहे, त्यामुळे भारताची प्रगती होईल अशी आशा काँग्रेसचे कार्याध्यक्ष राहुल यांनी व्यक्त केली. तसंच शिक्षण, विद्यापीठे, राजकीय व्यवस्था, सत्तेचे केंद्रीकरण यामध्ये बदल करण्याच्या आवश्यकतेवर राहुल यांनी भर दिला. पंतप्रधान होणार की नाही हा प्रश्नच गैरलागू असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं. आणि घराणेशाहीवर टीका केली. CII च्या परिषदेत राहुल गांधींनी आज भाषण केलं. यावेळी बोलताना राहुल यांनी आर्थिक धोरणाबद्दल ठोस काही सांगण्यापेक्षा उदाहरणे देऊन आपलं म्हणणं मांडण्यावर भर दिला. देशातली बेरोजगारी ही समस्या नाही, तर तरुणांना योग्य प्रशिक्षण मिळत नाही, ही आपली समस्या असल्याचं निरीक्षण त्यांनी नोंदवलं. गरीब, वंचित आणि महिलांचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही, तसंच राग आणि द्वेषामुळेही विकास साधत नाही असं मत राहुल यांनी व्यक्त केलं. शासन व्यवस्था निष्पक्ष आणि नियमांवर आधारित असली पाहिजे अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 4, 2013 11:53 AM IST

पंतप्रधानपदाचा प्रश्नच गैरलागू -राहुल गांधी

04 एप्रिल

भारतात प्रचंड सकारात्मक ऊर्जा आहे, मात्र तरुणांना पुढे येण्यासाठी पाठबळ दिलं पाहिजे. तसंच जनतेला आणि पर्यायानं देशाला पुढे जाण्यासाठी पायाभूत सोयींची गरज आहे, याकडेही त्यांनी उद्योजकांचं लक्ष वेधलं. भारताकडं प्रचंड गुणवंत मनुष्यबळ आहे, त्यामुळे भारताची प्रगती होईल अशी आशा काँग्रेसचे कार्याध्यक्ष राहुल यांनी व्यक्त केली. तसंच शिक्षण, विद्यापीठे, राजकीय व्यवस्था, सत्तेचे केंद्रीकरण यामध्ये बदल करण्याच्या आवश्यकतेवर राहुल यांनी भर दिला. पंतप्रधान होणार की नाही हा प्रश्नच गैरलागू असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं. आणि घराणेशाहीवर टीका केली.

CII च्या परिषदेत राहुल गांधींनी आज भाषण केलं. यावेळी बोलताना राहुल यांनी आर्थिक धोरणाबद्दल ठोस काही सांगण्यापेक्षा उदाहरणे देऊन आपलं म्हणणं मांडण्यावर भर दिला. देशातली बेरोजगारी ही समस्या नाही, तर तरुणांना योग्य प्रशिक्षण मिळत नाही, ही आपली समस्या असल्याचं निरीक्षण त्यांनी नोंदवलं. गरीब, वंचित आणि महिलांचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही, तसंच राग आणि द्वेषामुळेही विकास साधत नाही असं मत राहुल यांनी व्यक्त केलं. शासन व्यवस्था निष्पक्ष आणि नियमांवर आधारित असली पाहिजे अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 4, 2013 11:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close