S M L

26/11 चा राजकीय धक्का

26 डिसेंबरमुंबई हल्ल्यानंतर जणू राजकीय भूकंपच झाला. यात एक नव्हे तर तीन बड्या राजकीय नेत्यांना या हल्ल्याची नैतिक जबाबदारी घ्यावी लागली आणि पदावरुन पायउतार व्हावं लागलं.26 नोव्हेंबरच्या हल्ल्याच्यावेळी शिवराज पाटील केंद्रीय गृहमंत्री पदावर होते. मुंबई हल्ल्यापूर्वी देशभरात 40 छोटे मोठे दहशतवादी हल्ले झाले होते. शिवराज पाटलांची खुर्ची तरीही सलामत होती. मुंबईत हल्ला झाल्यानंतर 200 एनएसजी कमांडोंना घेऊन स्वत: पाटील पाच तासात मुंबईत दाखल झाले. पण ताज,ओबेरॉयमध्ये मारले गेलेली माणसं उद्योग क्षेत्रातील बडी मंडळी होती. उद्योग क्षेत्राकडून या हल्ल्याची जबाबदारी घेण्याबाबत दबाव आला आणि 30 नोव्हेंबरला शिवराज पाटील यांना गृहमंत्रीपद सोडावं लागलं.शिवराज पाटील यांच्या राजीनाम्याची बातमी आली आणि मुंबईत आर आर पाटील यांच्यावर राजीनामा कधी देणार अशी विचारणा झाली. आर आर पाटील यांच्या प्रतिक्रियेत अजिबातच गांभीर्य नव्हते. 'मोठ्या शहरात अशा गोष्टी घडणारच' असं ते म्हणाले. पण दुसर्‍याच दिवशी आर आर पाटील यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर भाषा सुरु झाली विलासराव देशमुखांच्या राजीनाम्याची. ते कदाचित वाचलेही असते पण रामगोपाल वर्मा आणि रितेश देशमुख यांच्या सोबत त्यांनी ताजमहाल हॉटेलला भेट दिली. त्यानं निर्माण झालेल्या आगीनं विलासरावांची खुर्ची फूंकून टाकली. मुंबई हल्ल्यामुळं जनतेत एवढी तीव्र भावना होती की स्वत: पंतप्रधानांना जनतेची माफी मागावी लागली. माफी तर मागितली, कारवाई देखील झाली, पण नवीन या पदांवर नव्यानं विराजमान होणार्‍या नव्या नेत्यांची जबाबदारी वाढली आहे. फक्त नेते बदलले, पण राजकीय भान आणि सामाजिक जाण तीच राहिली, तर तेवढं दुर्देव दुसरं नसेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 26, 2008 08:24 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 26, 2008 08:24 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close