S M L

26/11 नंतर महिनाभरात ताज आणि ओबेरॉय पुन्हा सुरू

26 डिसेंबर, मुंबई ताज आणि ऑबेराय हॉटेलवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. त्यात या दोन्ही हॉटेलचं अतोनात नुकसान झालं. मात्र अवघ्या महिन्याभराच्या कालावधीतच ही हॉटेल्स पुन्हा उभी राहिलेयत. हॉटेलमधील स्टाफ आणि कारागीर यांच्या अथक मेहनतीची आणि जिद्दीचीच ही कहाणी.ते 59 तास... तो अंदाधुंद गोळीबार... दिमाखदार हॉटेल्सना छिन्न करणारं ते दहशतवाद्यांचं थैमान... पण आता या आठवणींना ताजमहाल पॅलेसच्या स्मृतींमध्ये थारा नसेल. या हल्ल्यात ताजची गेलेली रया अवघ्या एका महिन्यातच रतन टाटा यांनी पुन्हा आणली. आणि ताज पुन्हा एकदा मुंबईकरांच्या जिद्दीचं प्रतीक बनलं. " ताज पुन्हा सुरू झाल्यामुळे आमची जिद्द मेलेली नाही, मुंबई पुन्हा उभी राहीलीय असा संदेश जाणार आहे.आम्हाला दुखापत होऊ शकेल पण आम्हाला कोणी झुकवू शकत नाही हेच आता ताजची ओल्ड विंग सुरू झाल्यानंतर सर्वांना समजून येईल." अशी उत्सफूर्त प्रतिक्रिया ताज पुन्हा सुरू करताना रतन टाटा यांनी दिली.ट्रायडंट हॉटेल्सनं तर ताजपेक्षा जास्त काळ दहशतवाद्यांशी झुंज दिली. ओबेरॉय हॉटेलमधल्या ओलीस ठेवलेल्या पर्यटकांना सोडवण्यासाठी एनएसजी कमांडोजनी जीवाची शर्थ केली. शेवटचा अतिरेकी टिपला गेला तेव्हा अतिरेक्यांच्या विरोधात चाललेल्या या लढाईचा चौथा दिवस उगवला होता. पण पुन्हा एकदा आपल्या लढाऊ बाण्याचा प्रत्यय देत ट्रायडंट महिनाभरात पुन्हा सुरू झालं आणि तेही पूर्वीच्या चुकांमधून सावरत कडेकोट सुरक्षाव्यवस्थेसह. "आता सुरक्षेसाठी काही पाहणी होईल, तुमचं सामान चेक केलं जाईल, मात्र तुम्ही या सर्व सुरक्षापाहणीला समजून घेतलं तर तुम्हांला कळेल की हे सर्व तुमच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठीच आम्ही करतोय" असं ट्रायडंट हॉटेलचे सीईओ रतन केसवानी यांनी सांगितलं.ताज-ओबेरॉयमध्ये लढलं गेलेलं युद्ध हे सीमेवरलं युद्ध नव्हतं. तर तो घरात झालेला हल्ला होता. त्यामुळे प्रत्येकजण या हल्ल्याबद्दल खूपच संवेदनशील आहे. आणि म्हणूनच अवघ्या महिन्याभरात उभं राहिलेलं ताज आणि ओबेराय हा प्रत्येक देशवासियाच्या अभिमानाचा विषय बनलाय.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 26, 2008 09:04 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 26, 2008 09:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close