S M L
  • संजूबाबा रडला, कोर्टाला शरण जाण्यास तयार !

    Published On: Mar 28, 2013 09:12 AM IST | Updated On: Mar 28, 2013 09:12 AM IST

    28 मार्चमुंबई : मी सुप्रीम कोर्टाचा आदर करतो..त्यामुळे मी दिलेल्या वेळेत कोर्टाला शरण जाणार असं अभिनेता संजय दत्त यानं स्पष्ट केलंय. सुप्रीम कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर अभिनेता संजय दत्त पहिल्यांदाच मीडियासमोर आला. पत्रकारांसमोर बोलताना त्याला अश्रू अनावर झाले. संजय दत्तची बहीण खासदार प्रिया दत्तही त्याच्यासोबत होती. आपल्याला कोर्टाबद्दल आदर आहे. त्यामुळे आपण माफीसाठी याचिका करणार नाही, असंही संजय दत्तनं स्पष्ट केलं आहे. आपल्या हातात असलेल्या दिवसांमध्ये आपल्या सिनेमांच्या शुटिंगची कामं पूर्ण करणार असल्याचंही त्यानं सांगितलंय. त्यासाठी आजपासून शुटिंगला सुरूवात करणार असल्याचंही तो म्हणाला. हा काळ आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबियांसाठी अत्यंत कठीण काळ असल्याच्या भावनाही दत्त यांनी व्यक्त केल्यात. मुंबईत झालेल्या 1993 साखळी बॉम्बस्फोटांमध्ये दोषी आढळलेला अभिनेता संजय दत्तवर शस्त्रात बाळगण्या प्रकरणी 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या अगोदरच त्यांने 18 महिन्यांची शिक्षा भोगली आहे. त्यामुळे संजय दत्तला झालेली शिक्षा पुरेशी असून त्याला माफी देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. संजय दत्तला माफी द्यावी अशी मागणी प्रेस काउंसिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनी केली आहे.संजय दत्त म्हणतो,मला आपल्याला हे सांगायचं की, मी सुप्रीम कोर्टाचा आदर करतो आणि कोर्टाने दिलेल्या निर्णयाचाही आदर करतो. त्यामुळे कोर्टाने दिलेली शिक्षा भोगणार आहे. मी कोर्टाने दिलेल्या वेळेत शरण जाणार आहे. मी कोणताही माफीचा अर्ज करणार नाही. माझ्याव्यतिरिक्त इतर बराचशा लोकांना माफीची गरज आहे आणि त्यास ते पात्र आहेत. माझी देश आणि माध्यमांना हात जोडून विनंती आहे की, जर माफीचा अर्ज करणार नाही तर त्याबाबत कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण करु नका. आता मी आणि माझं कुटुंब व्यथित झालोय. ही वेळ माझ्याकरिता फार कठीण आहे. माझ्याकडे जे दिवस उरलेत त्या दिवसात मी चित्रपटांचं शुटिंग आणि माझ्या परिवाराला वेळ देणार आहे. माझं माझ्या देशावर प्रेम आहे. - संजय दत्त झैबुन्निसा आणि संजय दत्तवर गुन्हे- झैबुन्निसावर टाडा कायद्याखाली कारवाई करण्यात आलीय- संजय दत्तवर शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत कारवाई आलीय - दोघांवरही बेकायदेशीरपणे शस्त्र आणि दारुगोळा बाळगण्याचा आरोप आहे - एके-56 आणि हँड ग्रेनेड बाळगल्याप्रकरणी झैबुन्निसावर कारवाई करण्यात आलीय- विना परवाना एके-56 रायफल बाळगल्याप्रकरणी संजय दत्तवर कारवाई करण्यात आलीय - दोघांनाही 5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलीय - झैबुन्निसाकडून कुठलंही शस्त्र सापडलेलं नाही- सहआरोपीच्या साक्षीवरून तिला दोषी ठरवण्यात आलं- संजय दत्तकडून 9एमएम पिस्तुल सापडलं- दोघंही सध्या जामिनावर बाहेर आहेत- 70 वर्षाच्या झैबुन्निसाच्या किडनीचं ऑपरेशन झालंय. तिला नियमित मेडिकल चेकअपची गरज आहे

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close