S M L

26/11 तील शहिदांना सर्वत्र श्रद्धांजली

26 नोव्हेंबरमुंबईतल्या दहशतवादी हल्ल्याला महिना उलटला. या हल्ल्यात शहीद झालेल्यांना आज मुंबईसह देशभरात श्रद्धांजली वाहण्यात आली. ताज आणि ओबेरॉय हॉटेल्सनंही महिन्याभरातच पूर्वपदावर येऊन मुंबईकरांच्या जिद्दीचीच चुणूक दाखवली आहे.मुंबईत 26 नोव्हेंबरच्या मध्यरात्री पहिल्यांदा हल्ला झाला ते हे लिओपाल्ड हॉटेल. दोनच दिवसात लिओपोल्ड पूर्ववत सुरू झालं. कुलाब्यातल्या या हॉटेलात परदेशी पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. हल्ल्यानंतरचे काही दिवस पर्यटकांचा ओघ आटला होता. पण आता पुन्हा परदेशी पर्यटक इकडे वळू लागले आहेत. आणि त्यांना कोणतीही भीती पण वाटत नाही. मुंबईसह पुण्यातही शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यामध्ये पुण्यातल्या सगळ्या शाळा, तसंच गणपतीची मंडळं आणि सीनियर सिटीझन्स सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी दहशतवादाशी लढण्याची शपथ घेतली. तसंच पुण्यात अशा आपत्कालीन हल्ल्याला तोंड देण्यासाठी 2 लाख नागरिकांना ट्रेनिंग देणार असल्याचं नागरी संरक्षण दलाच्या प्रमुखांनी सांगितलं. नाशिककरांनीही मानवी साखळी करून दहशतवादाचा निषेध केला. यावेळी नागरिक उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरले होते. विद्यार्थ्यांपासून ते वृद्धांपर्यंत तर रीक्षाचालकांपासून ते वकीलांपर्यंत असे सगळ्या स्तरातले नागरिक यात सहभागी झाले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 26, 2008 01:48 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 26, 2008 01:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close