S M L
  • लोकांची निष्ठुरता कॅमेर्‍यात कैद

    Published On: Apr 15, 2013 12:56 PM IST | Updated On: May 10, 2013 03:18 PM IST

    16 एप्रिलराजस्थानची राजधानी जयपूरमध्ये लोकांच्या निष्ठुरतेची एक धक्कादायक घटना कॅमेर्‍यात कैद झाली. 26 वर्षांची एक महिला आणि तिच्या 8 वर्षांच्या मुलीचा एका अपघातात मृत्यू झाला. भरधाव वेगात जाणार्‍या एका ट्रकनं त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली. त्यात आई आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला. यावेळी वडील आणि लहान मुलगा मदतीसाठी रस्त्यावर जाणार्‍या-येणार्‍यांकडे मदतीसाठी याचना करत होते. पण कुणीच त्यांच्या मदतीसाठी पुढे आलं नाही. अनेक गाड्या तिथून गेल्या. पण अपघातग्रस्त कुटुंबीयांना मदत करण्यासाठी कुणीच थांबलं नाही. अखेरीस बर्‍याच वेळेनंतर काही लोकं तिथं थांबली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close