S M L

राणेंना चूक सुधारण्याची संधी देऊ - विलासराव देशमुख

27 डिसेंबर लातूरपुरुषोत्तम भांगेमहाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर पहिल्यांदाच विलासराव देशमुख लातूरमध्ये आले होते. त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी नारायण राणेंना चूक सुधारण्याची संधी देऊ, असं म्हटलंय. कोणतीही गोष्ट करण्याआधी काँग्रेसची स्वत:ची एक पद्धत असते. निलंबन केल्यानंतर प्रत्येकाला सुधारण्याची एक संधी दिली जाते. त्यानंतर त्या व्यक्तीमध्ये आत्मपरिक्षणाने सुधारणा झाली तर ती चांगली गोष्ट आहे असंही ते पुढे म्हणाले. याआधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनीही राणेंबद्दल असंच म्हटलं होतं. याविधानांचा अर्थ आता काँग्रेसचे, नारायण राणे यांच्याबरोबर जुळवून घेण्याचे प्रयत्न जोरात सुरू झाले आहेत असंच समजतंय.दोनच दिवसांपूर्वी राणेंनी शरद पवारांची भेट घेतली होती. ते राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचं बोललं जातंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 27, 2008 01:28 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 27, 2008 01:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close