S M L

पाकिस्तानी रुग्णांना भारतीय डॉक्टर्सचा आधार

28 डिसेंबर, दिल्लीदेवश्री महाजनभारत आणि पाकिस्तानमधले राजकीय संबंध ताणले गेले आहेत. पण दोन देशांमधले लोक मात्र एकमेकांमधले नातेसंबंध जपतायत. याची खात्री लाहोरच्या रहीमला पाहिल्यावर पटते. 4 महिन्यांच्या रहीमला एका महत्त्वाच्या ऑपरेशनसाठी भारतात आणलं आहे. चार महिन्याचा रहीम हृदयाच्या विकाराने त्रस्त आहे. एवढ्या लहान वयातील हृदयावरच्या ऑपरेशनसाठी लाहोरवरून या कुटुंबाला दिल्ली गाठावी लागली. तीन आठवड्यांपूर्वी ते दिल्लीत आले आहेत. एस्कॉर्ट हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर ऑपरेशन झालं. एस्कॉर्टसारखी मोठी हॉटेल्स पाकिस्तानात असुनही केवळ इथल्या डॉक्टरांवरच्या विश्वासाखातर ते दिल्लीला आले. "त्याचं हृदय पूर्णपणे विकसित झालेलं नव्हतं त्यामुळे त्याच्या फुप्फुसांपर्यंत रक्तपुरवठा व्यवस्थित होत नव्हता" असं डॉक्टरांनी सांगितलं.दहशतवाद आणि युद्धाच्या बातम्यांवरून वातावरण तापलं असलं तरी त्यांना इथंच सुरक्षित वाटतंय. या ऑपरेशनसाठी डॉक्टरांनी सव्वा लाखाची सूट दिली. त्यावेळी या मध्यमवर्गीय कुटुंबाला इथले डॉक्टर देवदूतच भासले. "आमचा आवाज दोन्ही देशांच्या सरकारपर्यंत पोहचू दे किंवा नको पोहचू दे. पण आमची प्रार्थना शांततेसाठीच आहे. " असं रहीमच्या पालकांनी सांगितलं.तीन महिन्यानंतर त्यांना डॉक्टरांनी रहीमच्या तपासणीसाठी पुन्हा बोलवलंय. तोपर्यंत भारत पाकिस्तानमध्ये शांतता नांदेल अशीच रहीमच्या पालकांना आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 28, 2008 08:24 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 28, 2008 08:24 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close