S M L

मध्यप्रदेशात बलात्कार पीडित मुलीची प्रकृती चिंताजनक

22 एप्रिलमध्यप्रदेशात सिवनी जिल्ह्यातल्या घनसौर तालुक्यात बलात्कार झालेल्या 4 वर्षांच्या चिमुकलीची प्रकृती अजूनही चिंताजनकच आहे. तिच्यावर नागपुरातल्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या मुलीला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलंय. तसंच तिचं ब्लड प्रेशर देखील अनेक औषधं देऊन सामान्य ठेवलं जात असल्याचं डॉक्टरांनी मेडिकल बुलेटिनमध्ये सांगितलंय. तिच्यावर 17 एप्रिल रोजी बलात्कार झाला होता. बलात्कार झाल्यानंतर दुसर्‍याच दिवशी ती घनसौरमध्ये स्मशानभूमीजवळ बेशुद्ध अवस्थेत सापडली होती. या प्रकरणी 35 वर्षांच्या फिरोझ खानला अटक करण्यात आली आहे. तो वेल्डिंगचं काम करतो. पीडित मुलीला आधी जबलपूरच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिची प्रकृती गंभीर झाल्यानं तिला नागपूरला हलवण्याचे आदेश मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिले. या मुलीच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत मध्यप्रदेश सरकारकडून देण्यात आली आहे. पीडित मुलीची प्रकृती अत्यंत नाजूक आहे आणि तिला तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखाली ठेवण्यात आलं असल्याचे केअर हॉस्पिटलच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2013 02:19 PM IST

मध्यप्रदेशात बलात्कार पीडित मुलीची प्रकृती चिंताजनक

22 एप्रिल

मध्यप्रदेशात सिवनी जिल्ह्यातल्या घनसौर तालुक्यात बलात्कार झालेल्या 4 वर्षांच्या चिमुकलीची प्रकृती अजूनही चिंताजनकच आहे. तिच्यावर नागपुरातल्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या मुलीला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलंय. तसंच तिचं ब्लड प्रेशर देखील अनेक औषधं देऊन सामान्य ठेवलं जात असल्याचं डॉक्टरांनी मेडिकल बुलेटिनमध्ये सांगितलंय. तिच्यावर 17 एप्रिल रोजी बलात्कार झाला होता. बलात्कार झाल्यानंतर दुसर्‍याच दिवशी ती घनसौरमध्ये स्मशानभूमीजवळ बेशुद्ध अवस्थेत सापडली होती. या प्रकरणी 35 वर्षांच्या फिरोझ खानला अटक करण्यात आली आहे. तो वेल्डिंगचं काम करतो. पीडित मुलीला आधी जबलपूरच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिची प्रकृती गंभीर झाल्यानं तिला नागपूरला हलवण्याचे आदेश मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिले. या मुलीच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत मध्यप्रदेश सरकारकडून देण्यात आली आहे. पीडित मुलीची प्रकृती अत्यंत नाजूक आहे आणि तिला तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखाली ठेवण्यात आलं असल्याचे केअर हॉस्पिटलच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 22, 2013 11:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close