S M L

'बलात्कार फक्त दिल्लीतच नाही तर देशभर होतात'

22 एप्रिलदिल्लीत पाच वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणामुळे देशभर संतापची लाट पसरली आहे. यात केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बेजाबदार वक्तव्य करू आणखी भर पाडली. शिंदे यांनी बलात्कार प्रकरणी संसदेत निवेदन सादर केलंय. बलात्कार फक्त दिल्लीतच नाही तर संपूर्ण देशभर होतात, असं या निवेदनात म्हटल्यामुळे नवा वाद निर्माण झालाय. शिंदे यांच्या वक्तव्यामुळे विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. सुशीलकुमार शिंदे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली. या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज आधी दोनवेळा तहकूब करण्यात आलं. शेवटी उद्यापर्यंत कामकाज स्थगित करण्यात आलं. विशेष म्हणजे शिंदे यांनी या अगोदर ही बेजाबदार वक्तव्यामुळे अडचणीत आले होते.शिंदेंचं निवेदन, एका आरोपीला न्यायालयीन कोठडी झालीयं तर सहआरोपीला बिहारमधून अटक करण्यात आली. पीडित मुलीच्या वडिलांवर प्रकरण दडपण्यासाठी पोलिसांनी दबाव टाकल्याच्या आरोपाची चौकशी करण्याचे आदेश पोलीस सहआयुक्तांना दिले आहेत. या प्रकारच्या घटना देशाच्या इतर भागातही घडल्याची माहिती मिळाली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2013 02:16 PM IST

'बलात्कार फक्त दिल्लीतच नाही तर देशभर होतात'

22 एप्रिल

दिल्लीत पाच वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणामुळे देशभर संतापची लाट पसरली आहे. यात केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बेजाबदार वक्तव्य करू आणखी भर पाडली. शिंदे यांनी बलात्कार प्रकरणी संसदेत निवेदन सादर केलंय. बलात्कार फक्त दिल्लीतच नाही तर संपूर्ण देशभर होतात, असं या निवेदनात म्हटल्यामुळे नवा वाद निर्माण झालाय. शिंदे यांच्या वक्तव्यामुळे विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. सुशीलकुमार शिंदे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली. या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज आधी दोनवेळा तहकूब करण्यात आलं. शेवटी उद्यापर्यंत कामकाज स्थगित करण्यात आलं. विशेष म्हणजे शिंदे यांनी या अगोदर ही बेजाबदार वक्तव्यामुळे अडचणीत आले होते.

शिंदेंचं निवेदन, एका आरोपीला न्यायालयीन कोठडी झालीयं तर सहआरोपीला बिहारमधून अटक करण्यात आली. पीडित मुलीच्या वडिलांवर प्रकरण दडपण्यासाठी पोलिसांनी दबाव टाकल्याच्या आरोपाची चौकशी करण्याचे आदेश पोलीस सहआयुक्तांना दिले आहेत. या प्रकारच्या घटना देशाच्या इतर भागातही घडल्याची माहिती मिळाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 22, 2013 05:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close