S M L

मुनगंटीवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष

2 एप्रिलभाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी अखेर विदर्भातील आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. आता याबाबतची अधिकृत घोषणा आजपासून जळगावात सुरू झालेल्या भाजपच्या 14 व्या राज्य अधिवेशनात होईल. 2 एप्रिल ते 4 एप्रिल दरम्यान होणार्‍या या अधिवेशनात पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष नितीन गडकरींच्या प्रमुख उपस्थितीत ही नवीन प्रदेशाध्यक्षांची घोषणा होईल. मुनगंटीवार यांच्यासोबत रावसाहेब दानवे यांचेही प्रदेशाध्यक्षपदासाठी नाव चर्चेत होते. लो प्रोफाईल असलेले भाजपचे हे नेते चंद्रपूरमधून चारदा निवडून आले आहेत. यंदा चंद्रपूर मतदारसंघ राखीव झालेला असतानाही त्यांनी स्वत:चा उमेदवार निवडून आणला तसेच स्वत:ही निवडून आले. मागास मानले जाणारे विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली हे जिल्हे काँग्रेसचे मानले जात होते. पण मुनगंटीवार यांनी या जिल्ह्यांमध्ये भाजपचा चांगलाच प्रभाव निर्माण केला आहे. शिवाय मुनगंटीवार हे गडकरी आणि मुंडे या दोघांनाही मान्य होणारे नाव असल्याचे सांगितले जाते. अभ्यासू असणार्‍या मुनगंटीवार यांचे टीमवर्क चांगले आहे. त्यामुळे पक्षाला त्याचा निश्चित लाभ होईल, असे कार्यकर्त्यांचे मत आहे. सुधीर मुनगंटीवार हे भारतीय जनता पक्षाचे बल्लारपूरचे आमदार आहेत. एम.कॉम. एलएलबी, एमफील झालेले मुनगंटीवार 1993मध्ये महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष झाले. 1996मध्ये त्यांची महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली. तर 1999 ते 2004मध्ये ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य झाले. तर युती सरकारच्या काळात फेब्रुवारी 1999 ते ऑक्टोबर 1999मध्ये त्यांची राज्याच्या पर्यटन आणि ग्राहक संरक्षण खात्याच्या मंत्रीपदी नियुक्ती झाली. सध्या ते भाजपचे चंद्रपूरचे आमदार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 2, 2010 08:10 AM IST

मुनगंटीवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष

2 एप्रिल

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी अखेर विदर्भातील आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

आता याबाबतची अधिकृत घोषणा आजपासून जळगावात सुरू झालेल्या भाजपच्या 14 व्या राज्य अधिवेशनात होईल.

2 एप्रिल ते 4 एप्रिल दरम्यान होणार्‍या या अधिवेशनात पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष नितीन गडकरींच्या प्रमुख उपस्थितीत ही नवीन प्रदेशाध्यक्षांची घोषणा होईल.

मुनगंटीवार यांच्यासोबत रावसाहेब दानवे यांचेही प्रदेशाध्यक्षपदासाठी नाव चर्चेत होते.

लो प्रोफाईल असलेले भाजपचे हे नेते चंद्रपूरमधून चारदा निवडून आले आहेत. यंदा चंद्रपूर मतदारसंघ राखीव झालेला असतानाही त्यांनी स्वत:चा उमेदवार निवडून आणला तसेच स्वत:ही निवडून आले.

मागास मानले जाणारे विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली हे जिल्हे काँग्रेसचे मानले जात होते. पण मुनगंटीवार यांनी या जिल्ह्यांमध्ये भाजपचा चांगलाच प्रभाव निर्माण केला आहे.

शिवाय मुनगंटीवार हे गडकरी आणि मुंडे या दोघांनाही मान्य होणारे नाव असल्याचे सांगितले जाते. अभ्यासू असणार्‍या मुनगंटीवार यांचे टीमवर्क चांगले आहे. त्यामुळे पक्षाला त्याचा निश्चित लाभ होईल, असे कार्यकर्त्यांचे मत आहे.

सुधीर मुनगंटीवार हे भारतीय जनता पक्षाचे बल्लारपूरचे आमदार आहेत. एम.कॉम. एलएलबी, एमफील झालेले मुनगंटीवार 1993मध्ये महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष झाले.

1996मध्ये त्यांची महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली. तर 1999 ते 2004मध्ये ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य झाले.

तर युती सरकारच्या काळात फेब्रुवारी 1999 ते ऑक्टोबर 1999मध्ये त्यांची राज्याच्या पर्यटन आणि ग्राहक संरक्षण खात्याच्या मंत्रीपदी नियुक्ती झाली.

सध्या ते भाजपचे चंद्रपूरचे आमदार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 2, 2010 08:10 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close