S M L

दक्षिण अफ्रिकेचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय

30 डिसेंबर, मेलबर्नदक्षिण आफ्रिकेनं,ऑस्ट्रेलियाविरुद्धची टेस्ट सिरीज जिंकली आहे. मेलबर्नवरची दुसरी टेस्ट दक्षिण आफ्रिकेनं नऊ विकेटनं जिंकली आणि सीरिज खिशात घातली. ऑस्ट्रेलियानं ठेवलेलं,183 रन्सचं टार्गेट,दक्षिण आफ्रिकेनं एक विकेट गमावत पूर्ण केलं.कॅप्टन ग्रॅमी स्मीथनं पंच्याहत्तर काढले. दहा विकेट घेणारा स्टेन मॅन ऑफ द मॅच ठरला.दक्षिण आफ्रिकेनं पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात टेस्ट सिरीज जिंकली आहे.यानंतर होणारी तीसरी टेस्टही दक्षिण आफ्रिकेनं जिंकल्यास, दक्षिण आफ्रिका रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर येईल. 1992-93 नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाला,त्यांच्याच देशात पराभव स्वीकारावा लागला.वर्ल्ड कप विजेत्या ऑस्ट्रेलियासाठी हा फार मोठा धक्का आहे. गेले काही दिवस त्यांची कामगिरी खालावली आहे. भारतात तर त्यांना सीरिज गमवावी लागलीच, पण आता दक्षिण अफ्रिकेने मायदेशात त्यांना धुळ चारली आहे. कॅप्टन रिकी पाँटिंगची वैयक्तिक कामगिरी चांगली होत असली तरी कॅप्टन म्हणून त्याच्या क्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 30, 2008 04:21 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 30, 2008 04:21 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close