S M L

सरबजीतचं पार्थिव भारतात आणणार

Sachin Salve | Updated On: May 3, 2013 10:01 AM IST

सरबजीतचं पार्थिव भारतात आणणार

02 मे

पाकिस्तान : लाहोरच्या तुरुंगात पाकच्या कैद्यांनी प्राणघातक हल्ल्यात कोमात गेलेल्या सरबजीत सिंग यांचा काल रात्री 1 वाजता जिना हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. गेल्या सहा दिवसांपासून सरबजीत मृत्यूशी लढा देत होता. मात्र अखेर गुरूवारी रात्री त्यांने अखेरचा श्वास घेतला. त्यांचं पार्थिव आज संध्याकाळी भारतात परत आणणार आहेत.

सरबजीत सिंगच्या मृत्यूनंतर भारतामध्ये संतापाची लाट उसळली आहे. सरबजीतचा मृत्यू ही हत्या असल्याचा आरोप सरबजीतची बहिण दलबीर कौर यांनी केला. पाकिस्ताननं भारताच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. पाकला धडा शिकवण्यासाठी भारताने कडक कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली. सरबजीतच्या मृत्यूचे पडसाद संसदेतही उमटले.सरबजीतला जिवंत परत आणण्यात सरकार अपयशी ठरलं अशी टीका विरोधकांनी केली. तर यामुळे भारत-पाक संबंधांवर परिणाम होईल, असं परराष्ट्र मंत्रालयातल्या सूत्रांनी सांगितलं.

सरबजीत सिंग यांच्यावर 26 एप्रिल रोजी लाहोरमधल्या कोट लखपत तुरुंगात काही कैद्यांनी प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात सरजबजीतच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तो कोमात गेला होता. त्याला गंभीर अवस्थेत जिना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर गेली सहा दिवस सरबजीत मृत्युशी लढत होते. मंगळवारी त्यांचा ब्रेनडेड झाला होता. सरबजीत यांचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी हलवण्यात आला आहे. सरबजीतचं कुटुंबीय कालच भारतात परतलं होतं. सरबजीतच्या मृत्युबाबत पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला. वाचण्याची आशा मावळल्यानंतर सरबजीतला व्हेटीलेटरवरून काढून घेण्यात आलं. मात्र कोणाच्या परवानगीनं त्यांचं व्हेटींलेटर काढून घेण्यात आलं, हा प्रश्न उपस्थित झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 2, 2013 10:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close