S M L
  • सरबजीतला अखेरचा निरोप

    Published On: May 3, 2013 01:28 PM IST | Updated On: May 10, 2013 11:31 AM IST

    03 मेपंजाब : सरबजीत सिंग यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. पंजाबमधल्या त्यांच्या मूळ गावी भिखिविंडमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. यावेळी काँग्रेसचे कार्याध्यक्ष राहुल गांधीही पोहोचले होते. तसंच पंजाबचे मुख्यंमंत्री प्रकाश सिंग बादल आणि उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल हेही आले होते. सरबजीतना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो लोक उपस्थित होते. भिकिविंडमध्ये सरबजीतसाठी सामुदायिक प्रार्थना करण्यात आल्या. त्यांचं पार्थिव काल रात्री आठ वाजता विशेष विमानानं लाहोरहून अमृतसरला पोचलं. दरम्यान, सरबजीतचा मृत्यू हृदयविकाराने नाही तर डोक्यात रॉड लागल्याने झाल्याचं पाकिस्तानच्या डॉक्टरांनी केलेल्या पोस्ट मॉर्टेमच्या अहवालात नमूद करण्यात आलंय. मात्र, हा अहवाल पाकिस्तान सरकार भारताकडं सोपवेल की नाही ते स्पष्ट झालेलं नाही.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close