S M L

डी बी रिअॅलिटी प्रकरणी कृपाशंकरसिंह अडचणीत

26 मार्चडीबी रिअॅलिटी च्या शाहिद बलवा यांच्या अटकेनंतर अनेक खुलासे होत आहेत. डीबी रिऍलिटीकडून 4 कोटी रुपये मिळवल्याप्रकरणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह त्यांचा मुलगा नरेंद्रमोहनसिंह वादात सापडले आहेत. 2009 मध्ये डीबी रिऍलिटीने नरेंद्र मोहनसिंह, यांच्या समता सहकारी बँकेच्या खात्यात 4 कोटी रुपये जमा केले. याप्रकरणी काळ्या पैशांची अफरातर झाल्याचा आरोप माहिती अधिकारी संजय तिवारी यांनी केला आहे. याबाबत त्यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. तसेच याप्रकरणी मुंबई हायकोर्टानं गेल्या 4 मार्चला ईडी,आयटी आणि ऍन्टी करप्शन ब्युरो या विभागाना कृपाशंकरसिंह आणि मुलगा नरेंद्र मोहनसिंह यांची चौकशी करुन चार आठवड्यांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, आपल्या मुलानं डीबी रिऍलिटीकडून 4 कोटींच कर्ज घेतलं होतं आणि ते चुकवलं सुद्धा त्याची माहिती मुलाच्या इन्कटॅक्स रिटर्नसमध्ये दाखवण्यात आली आहे.असा खुलासा कृपाशंकरसिंह यांनी आयबीएन-लोकमतकडे केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 26, 2011 08:26 AM IST

डी बी रिअॅलिटी  प्रकरणी कृपाशंकरसिंह अडचणीत

26 मार्चडीबी रिअॅलिटी च्या शाहिद बलवा यांच्या अटकेनंतर अनेक खुलासे होत आहेत. डीबी रिऍलिटीकडून 4 कोटी रुपये मिळवल्याप्रकरणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह त्यांचा मुलगा नरेंद्रमोहनसिंह वादात सापडले आहेत. 2009 मध्ये डीबी रिऍलिटीने नरेंद्र मोहनसिंह, यांच्या समता सहकारी बँकेच्या खात्यात 4 कोटी रुपये जमा केले. याप्रकरणी काळ्या पैशांची अफरातर झाल्याचा आरोप माहिती अधिकारी संजय तिवारी यांनी केला आहे. याबाबत त्यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. तसेच याप्रकरणी मुंबई हायकोर्टानं गेल्या 4 मार्चला ईडी,आयटी आणि ऍन्टी करप्शन ब्युरो या विभागाना कृपाशंकरसिंह आणि मुलगा नरेंद्र मोहनसिंह यांची चौकशी करुन चार आठवड्यांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, आपल्या मुलानं डीबी रिऍलिटीकडून 4 कोटींच कर्ज घेतलं होतं आणि ते चुकवलं सुद्धा त्याची माहिती मुलाच्या इन्कटॅक्स रिटर्नसमध्ये दाखवण्यात आली आहे.असा खुलासा कृपाशंकरसिंह यांनी आयबीएन-लोकमतकडे केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 26, 2011 08:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close