S M L

सुरेश कलमाडींची पुण्यात 'एंट्री'

04 फेब्रुवारीकॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी 9 महिने तिहारच्या तुरुंगाची हवा खाऊन बाहेर आलेले सुरेश कलमाडी अखेर पुण्यात दाखल झाले आहे. कलमाडींची काही वेळापुर्वीच पुणे विमानतळावर एंट्री झाली. कलमाडी पुण्यात आले याची खबर समर्थक, कार्यकर्त्यांना लागताचा विमानतळावर एकच गर्दी केली. कलमाडी समर्थकांनी 'सबसे बडा खिलाडी सुरेश कलमाडी' अशा घोषणाबाजी करत विमानतळाचा परिसर दणाणून सोडला. मोठ्या जल्लोषात कार्यकर्त्यांनी कलमाडींचे स्वागत केले. आणि कलमाडींची जंगी मिरवणूक काढली आहेत.कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी आरोपी असलेले सुरेश कलमाडी यांना मागिल महिन्यात कोर्टाने जामीन दिला. ऐन निवडणुकांच्या तोंडावर जामीन मिळाल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. कलमाडी पुन्हा राजकारणात सक्रिया होतील अशी चर्चा सर्वत्र सुरु झाली. मात्र प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी कलमाडींना निवडणुकात सक्रिय होता येणार नाही असं स्पष्ट केलं. मात्र कलमाडी पडद्यामागून सुत्र हलवतील अशी शंका यावेळी निर्माण झाली. पण पतियाळा कोर्टाने कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी कागद पत्रांची छानणी सुरु केली आणि कलमाडींना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले. यामुळे कलमाडींचा पुणे दौरा रद्द झाला. दिल्लीत महिन्याभराचा मुक्काम करुन आज अचानक कलमाडींनी पुण्यात एंट्री केली आणि अगोदरच तापलेल्या राजकीय वातावरणात तेल ओतले. कलमाडींच्या एंट्रीमुळे समर्थकांनी एकच जल्लोष केला. 'सबसे बडा खिलाडी सुरेश कलमाडी' अशा घोषणाबाजी करत विमानतळाचा परिसर दणाणून सोडला मोठ्या जल्लोषात कार्यकर्त्यांनी कलमाडींचे स्वागत केले तसेच जंगी मिरवणूक काढली. मिरवणुकीनंतर कलमाडी ससून हॉस्पिटलमध्ये गेले. तिथं त्यांनी एसटी अपघातातल्या जखमींची भेट घेतली आणि त्यांची विचारपूस केली. त्यानंतर कलमाडी दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी गेले आणि तिथं गणपतीची पूजा केली. गणपतीचं दर्शन घेऊन कलमाडी आपल्या घरी गेले. 'काँग्रेस का बडा खिलाडी'अखेर 9 महिन्यांनंतर येणार की नाही या शंकेवर पडदा टाकत सुरेश कलमाडी पुण्यात दाखल झाले. त्यांचं स्वागत आणि स्वागतावर टीका दोन्हीही जोरदार झालं. स्वागताला जायचं की नाही अशा द्विधा मनस्थितीतले नेते आणि कार्यकर्तेही आवर्जून आले. आता पुणेकरांची नजर आहे, ती कलमाडींच्या पुढच्या हालचालींवर...हजारो कार्यकर्ते , जोरदार घोषणाबाजी आणि जंगी स्वागत....निलंबित काँग्रेस खासदार सुरेश कलमाडी पुण्यात आल्यानंतरचं हे वातावरण होतं. कलमाडींचे काँग्रेसमधील समर्थकही अगदी जातीने हजर होते. काहींनी मीडियाच्या नजरा चुकवल्या तर काहींनी शब्दांच्या कसरतीही केल्या. पण आनंद काही लपवू शकले नाहीतच. भाजपने याला कंत्राटी स्वागत म्हणून हिणवलंय, तर एखादी कुस्ती जिंकून आल्यानंतर जस स्वागत होतं तशी स्वागत करण्याची मानसिकता झालीये काय असं खुद्द शरद पवार यांनी म्हटलं आहे.'काँग्रेस का बडा खिलाडी' म्हणून कलमाडी पुण्यात दाखल झाले आहे. कारभार बदला असं शरद पवारांचं आवाहन आहे. पुण्याच्या निवडणुकीत आता कुठं रंग भरायला लागलाय. कलमाडीचं स्वागत विरोधकांनी गांभीर्यान घेतलंय एवढं मात्र खरं.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 4, 2012 01:24 PM IST

सुरेश कलमाडींची पुण्यात 'एंट्री'

04 फेब्रुवारी

कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी 9 महिने तिहारच्या तुरुंगाची हवा खाऊन बाहेर आलेले सुरेश कलमाडी अखेर पुण्यात दाखल झाले आहे. कलमाडींची काही वेळापुर्वीच पुणे विमानतळावर एंट्री झाली. कलमाडी पुण्यात आले याची खबर समर्थक, कार्यकर्त्यांना लागताचा विमानतळावर एकच गर्दी केली. कलमाडी समर्थकांनी 'सबसे बडा खिलाडी सुरेश कलमाडी' अशा घोषणाबाजी करत विमानतळाचा परिसर दणाणून सोडला. मोठ्या जल्लोषात कार्यकर्त्यांनी कलमाडींचे स्वागत केले. आणि कलमाडींची जंगी मिरवणूक काढली आहेत.

कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी आरोपी असलेले सुरेश कलमाडी यांना मागिल महिन्यात कोर्टाने जामीन दिला. ऐन निवडणुकांच्या तोंडावर जामीन मिळाल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. कलमाडी पुन्हा राजकारणात सक्रिया होतील अशी चर्चा सर्वत्र सुरु झाली. मात्र प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी कलमाडींना निवडणुकात सक्रिय होता येणार नाही असं स्पष्ट केलं. मात्र कलमाडी पडद्यामागून सुत्र हलवतील अशी शंका यावेळी निर्माण झाली. पण पतियाळा कोर्टाने कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी कागद पत्रांची छानणी सुरु केली आणि कलमाडींना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले. यामुळे कलमाडींचा पुणे दौरा रद्द झाला.

दिल्लीत महिन्याभराचा मुक्काम करुन आज अचानक कलमाडींनी पुण्यात एंट्री केली आणि अगोदरच तापलेल्या राजकीय वातावरणात तेल ओतले. कलमाडींच्या एंट्रीमुळे समर्थकांनी एकच जल्लोष केला. 'सबसे बडा खिलाडी सुरेश कलमाडी' अशा घोषणाबाजी करत विमानतळाचा परिसर दणाणून सोडला मोठ्या जल्लोषात कार्यकर्त्यांनी कलमाडींचे स्वागत केले तसेच जंगी मिरवणूक काढली. मिरवणुकीनंतर कलमाडी ससून हॉस्पिटलमध्ये गेले. तिथं त्यांनी एसटी अपघातातल्या जखमींची भेट घेतली आणि त्यांची विचारपूस केली. त्यानंतर कलमाडी दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी गेले आणि तिथं गणपतीची पूजा केली. गणपतीचं दर्शन घेऊन कलमाडी आपल्या घरी गेले.

'काँग्रेस का बडा खिलाडी'अखेर 9 महिन्यांनंतर येणार की नाही या शंकेवर पडदा टाकत सुरेश कलमाडी पुण्यात दाखल झाले. त्यांचं स्वागत आणि स्वागतावर टीका दोन्हीही जोरदार झालं. स्वागताला जायचं की नाही अशा द्विधा मनस्थितीतले नेते आणि कार्यकर्तेही आवर्जून आले. आता पुणेकरांची नजर आहे, ती कलमाडींच्या पुढच्या हालचालींवर...

हजारो कार्यकर्ते , जोरदार घोषणाबाजी आणि जंगी स्वागत....निलंबित काँग्रेस खासदार सुरेश कलमाडी पुण्यात आल्यानंतरचं हे वातावरण होतं. कलमाडींचे काँग्रेसमधील समर्थकही अगदी जातीने हजर होते. काहींनी मीडियाच्या नजरा चुकवल्या तर काहींनी शब्दांच्या कसरतीही केल्या. पण आनंद काही लपवू शकले नाहीतच. भाजपने याला कंत्राटी स्वागत म्हणून हिणवलंय, तर एखादी कुस्ती जिंकून आल्यानंतर जस स्वागत होतं तशी स्वागत करण्याची मानसिकता झालीये काय असं खुद्द शरद पवार यांनी म्हटलं आहे.

'काँग्रेस का बडा खिलाडी' म्हणून कलमाडी पुण्यात दाखल झाले आहे. कारभार बदला असं शरद पवारांचं आवाहन आहे. पुण्याच्या निवडणुकीत आता कुठं रंग भरायला लागलाय. कलमाडीचं स्वागत विरोधकांनी गांभीर्यान घेतलंय एवढं मात्र खरं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 4, 2012 01:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close