S M L

नजर 2008 मधील गुन्हेगारीवर...

30 डिसेंबर, मुंबईअजित मांढरे2008 हे वर्ष गुन्ह्यांच्या बाबतीत हे वर्ष फारच चर्चेत राहीलं. सुरूवातीपासूनच महाराष्ट्राला धक्के देणा-या गुन्हेगारी घटनांनी हे वर्ष गाजलं. एक नजर टाकूया काही ठळक घटनांवर... 2008 हे वर्ष दहशतवाद्यांच्यां नावावरच लिहीलं जाईल. वर्षाची सुरूवातचं खराब झाली. मुंबईतल्या जुहू इथल्या एका हॉटेलमध्ये परदेशी मुलींचा विनयभंग करण्यात आला. हे प्रकरण चांगलच गाजलं. विशेष म्हणजे ह्या प्रकरणातील आरोपी अजूनही फरार आहे. त्यानंतर देशातील एक क्रूर हत्याकांड घडलं, ते म्हणजे मुंबईतलं नीरज ग्रोवर हत्याकांड . त्याच्या शरीराचे अक्षरशः 300 तुकडे करण्यात आले आणि ह्या हत्येचा कट रचल्याचा आरोप नीरजच्याच प्रेयसीवर आहे. मटका किंग सुरेश भगत याची हत्याही गुन्हेगारी जगतातली मोठी घटना ठरली आणि हे प्रकरण भोवलं डॅडींना म्हणजेच अरुण गवळींना. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणा-या दंगलीही यावर्षी चांगल्याच गाजल्या. मुलुंडमधील दंगलीनं फटका दिला तो मुंबईच्या लाईफ लाईनला म्हणजेच लोकल ट्रेनला. मनसेनं निर्माण केलेल्या वातावरणामुळे काही ठिकाणी परिस्थिती हाताबाहेर गेली होती. याच पार्श्वभूमीवर घडलं ते राहुल राज प्रकरण. आजही या प्रकरणावरुन राजकारण होतच आहे. पोलिसांच्या दृष्टीनं हे वर्ष तर फार चढउताराचं होतं. दाऊदचा साथीदार करीमुल्लाला पकडण्यात पोलिसांना यश आलं. 7/11 चे आरोपीही पोलिसांच्या जाळ्यात आले. पण, पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यापू्र्‌वीच देश पुन्हा हादरला तो इंडियन मुजाहिद्दीनच्या सिरीयल ब्लास्टमुळे आणि या सर्वांचे धागेदोरे मंुबईच्याच दिशेनं होते. पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिका-यांमुळे पोलिसांनी या प्रकरणाचा छडा काही महिन्यांतच लावला.त्याचवेळी पोलीस महासंचालकांवर पदमुक्तीची टांगती तलवार आली. त्यानंतर पोलिसांच्या इमानदारीवर ताशेरे ओढणारं मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणही पोलिसांनी धाडसानं उघड केलं.पोलिसांनी जे काम केलं ते गौरवास्पद होतं, पण 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानं मात्र पोलिसांसह अवघा देशच हादरला. या हल्ल्यानं मुंबई पोलिसांचा कणाच मोडला. यात तीन धडाकेबाज पोलीस अधिकारी मुंबई पोलिसांनी गमावले. यावर राजकरणही झालं. निष्पाप पोलिसांना या अग्निपरिक्षेतून जावं लागलं. पण, अजमल कसाबला पकडल्यामुळं मुंबई पोलिसांचं धाडस सा-या जगानं पाहिलं.अजूनही आव्हानं संपली नाहीत. नव्या वर्षात गुन्हे घडणारच आहेत. पण निदान पोलिसांच्या कार्यक्षमतेमुळे गुन्ह्यांची संख्या कमी व्हावी, किमानपक्षी गुन्हेगारांवर वचक तरी बसावा, हीच सामान्य माणासाची अपेक्षा आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 30, 2008 02:32 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 30, 2008 02:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close