S M L

नवीन वर्षाचं स्वागत

सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...वर्ष नवीन आहे, चला आपणही नवीन होऊया, नव्या उत्साहाने चला जग जिंकू या...प्रत्येकालाच हवी असते एक नवी संधी, नवं काहीतरी घडवण्यासाठी, स्वतःला सिद्ध करण्यासाठी नवं वर्ष हे अशा अनेक संधी घेऊन येतं. नवं वर्ष नव्या आशांचा नवा उत्साह घेऊन येतं. जुने जाऊ द्या मरणालागुनी, असं लोक म्हणतात. पण जुनं असं विसरता येत नाही. गत वर्षात देशात अनेक ब-या वाईट घटना घडल्या. त्यांचा आपल्या जीवनावरचा प्रभाव आपल्याला पुसता येणार नाही. पण ठरवलं तर ते सारं बदलता येईल. पण त्यासाठी इच्छाशक्ती हवी. या नव्या वर्षाने ती इच्छाशक्ती प्रत्येक भारतीयाच्या मनात जागृत करावी. आणि येणा-या वर्षात आपलं राज्य,आपला देश अधिक एकात्म आणि अधिक समृद्ध व्हावा. ज्ञानेश्वरांच्या पसायदानाप्रमाणेच दुरितांचे तिमीर जावो, विश्व स्वधर्म सुर्य पाहोजो जे वांछिल, तो ते लाहो, प्राणीजात अशीच प्रार्थना करुया. नवीन वर्षाच्या पहिल्या पहाटेचा पहिला सुर्योदय आशेची, शांततेची, लक्ष लक्ष किरणे उजळत यावा हीच तुम्हा सगळ्यांसाठी शुभेच्छा.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 31, 2008 06:34 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 31, 2008 06:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close