S M L

नवीन वर्षातल्या गुंतवणुकीच्या सुवर्णसंधी

1 जानेवारी, नवी दिल्लीलक्ष्मण रॉय 2008 या सरत्या वर्षात शेअरमार्केटनं चांगले रिटर्न्स दिले नाहीयेत. किंबहुना रिअल इस्टेट क्षेत्रातही मंदीमुळे फारसं चमकदार काही घडलं नाही. पण सोन्यानं मात्र आपली चमक कायम राखली आहे. त्यामुळे सोन्यामधली गुंतवणूक यावर्षी फायद्याची ठरली आहे. गुंतवणुकदारांना त्यात 30 टक्के फायदा झाला आहे. त्यामुळे नवीन वर्षं कोणती सुवर्णसंधी घेऊन येतं आहे, याकडे सगळ्यांचं लक्ष्य लागून राहिलं आहे. इक्विटी मार्केटला मंदीचा हिसका बसला आणि गुंतवणूकदारांचे खिसे खाली झाले. त्यामुळं गुंतवणुदारांनी आपला मोर्चा वळवला तो सोन्याकडं. सोन्यात गुंतवणूक करणार्‍यांची मंदीतही चांदी झाली. काहीच नाही तर निदान 30 टक्के रिटर्न्स तरी गुंतवणुकदारांना मिळाले आहेत. ज्यांनी ज्यांनी 2008 मध्ये सोन्यात एक लाखांची गुंतवणूक केली, त्यांना त्यांना वर्षअखेरीस पर्यंत 30 हजारांचा फायदा झाला आहे. आणि दुसरीकडे ज्यांनी एक लाखांची रक्कम बॉन्ड्समध्ये गुंतवली असेल तर आज त्यांना 10 हजारांचा फायदा होणार आहे. शेअर्समध्ये ज्यांनी लाखाची गुंतवणूक केली त्यांच्या हातात मात्र 46 हजार रुपयेच पडतील. अशाच प्रकारे सरत्या वर्षात म्यूच्युअल फंडामधल्या गुंतवणुकीत 30 ते 40 टक्के नुकसान झालं आहे. " आर्थिक अनिश्चितता जसजशी वाढत गेली, तसतसं गुंतवणुकदारांनी सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोनंच पसंत केलं, " असं रेलिगियर कमोडिटीजचे हेड जयंत मांगलिक यांचं म्हणणं आहे. नवीन वर्षातही सोन्यातली गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे, असं तज्ज्ञांच मत आहे. त्याशिवाय बँकांवरही व्याजदर कमी करण्याचा दबाव राहणार आहे. त्यामुळं अशा परिस्थितीत सोन्यातली गुंतवणूक लोकांना खात्रीलायक रिटर्न देणारी आहे. अमेरिकेतल्या आर्थिक परिस्थितीक डे पाहता, डॉलर्सचं मूल्य कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळं सोन्याचे दरही कमी होतील. " यंदा तुमच्याकडची 10 टक्के गुंतवणुक सोन्यात करा, " असा सल्ला बजाज कॅपिटलचे सीईओ अनिल चोपड़ा यांनी यावर्षीच्या गुंतवणुकदारांसाठी दिला आहे. याचा अर्थ एकच नवीन वर्षात तुम्ही कशातही गुंतवणूक करा. पण काही हिस्सा सोन्यात मात्र नक्की गुंतवा.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 1, 2009 06:26 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 1, 2009 06:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close