S M L

बुलढाण्यात सिक्कीम लॉटरीनं शेतकर्‍याला फसवलं

1 जानेवारी, बुलढाणा राहुल पहुरकर तीन कोटींची सुपर लोटो लॉटरी लागूनही बुलढाणा जिल्ह्यातल्या एका शेतकर्‍याला अजूनही त्याचे पैसे मिळाले नाहीत. विजेत्यांचं नाव जाहिरातीपुरतं वापरून, सिक्कीमची ही लॉटरी प्रत्यक्षात पैसे द्यायला मात्र टाळाटाळ करत आहे. फसवणूक झालेल्या शेतक-याचं नाव गजानन ठगे आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिचोंलीच्या गजानन ठगेंना लॉटरी खेळण्याचा छंद आहे. गजाननना एक-दोन लाख रुपये नाही तर , गव्हरमेंट ऑफ सिक्कीमची चक्क 3 कोटी 38 लाख रुपयांची लॉटरी लागली. पण कित्येक महिने उलटूनही अद्यापही गजाननला पैसेच मिऴाले नाहीत. " मी वांरवार पैसे मिळण्यासाठी लॉटरीचे अधिका-यांशी संपर्क साधला पण कुणीही काहीच बोलायला तयार नाही .ही लॉटरी गव्हरमेंट ऑफ सिक्कीमची आहे लॉटरीचा खप वाढावा म्हणून माझ्या फोटोचा आणि नावाचाही संपुर्ण देशात लॉटरींच्या जाहीरातींव्दारे उपयोग करून घेत आहे . मी लवकरच या संदर्भात कार्टात न्यायासाठी दाद मागणार आहे, " असं फसवणूक झालेले शेतकरी गजानन ठगें म्हणाले. लॉटरी लागल्यानं खूष झालेल्या गजानन आणि त्याच्या कुंटुबियांची स्वप्न आता पार चूर झालीयेत. " खूप स्वप्न पाहिली पण आता आमच्या सारख्या गरीबाला हे लॉटरीवाले बक्षिस लागून ही पैसे द्यायला तयार नाही त्यामुळे पाहिलेली स्वप्ने भंग झाली आहेत, " अशी खंत गजानन ठगेंची पत्नी लक्ष्मी ठगे यांनी व्यक्त केली. स्वप्नांसाठी लॉटरी काढणा-यांना काढलेली लॉटरी सिक्कीमची नाही ना याची खात्री करा..." असा सावधानतेचा इशाराही लक्ष्मी ठगे यांनी दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 1, 2009 06:38 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 1, 2009 06:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close