S M L

नरेंद्र मोदींनी उधळली रामदेव बाबांवर स्तुतीसुमनं

26 एप्रिलगुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज हरिव्दारमध्ये झालेल्या कार्यक्रमात योगगुरू रामदेव बाबांवर स्तुतीसुमनं उधळली. रामदेव बाबा यांचे कार्य महान आहे. त्यांनी देशासह परदेशात योग विद्येचा मोठा प्रसार केला आहे. देशवासियांना त्यांनी स्वस्थ जगण्याचा मंत्रा दिला आहे. मात्र केंद्र सरकारने त्यांनी काळ्या पैशामुद्यावर केलेल्या आंदोलनात अत्याचार केला आहे. असं सांगत मोदींनी सरकारच्या कारवाईचा निषेध व्यक्त करत मोदींनी पंतप्रधानपदाच्या वाटचाली साठी संतांचे आशीर्वाद घेतले. हरिद्वारमध्ये योगगुरू बाबा रामदेव यांनी उभारलेल्या पतंजली योगपीठाच्या नवीन शाळेचं उद्घाटन मोदींच्या हस्ते पार पडलं. यावेळी ते बोलत होते. आजपर्यंतच्या झालेल्या निवडणुकीत मला ज्यांनी मतं दिली तिही माझी माणसं होती आणि ज्यांनी नाही दिली तिही माझीच माणसं होती. आजही मी त्याच मार्गावर चालत आहे. सगळ्यांना सुख आणि शांती लाभो एवढेच माझे ध्येय आहे अशी भावना मोदी यांनी व्यक्त केली. कुंभ मेळाव्याला येऊ शकलं नाही याची सल मनात कायम आहे. पण आज संतांच्यामध्ये बसण्याचं, त्यांच्या सानिध्यात राहण्याचं भाग्य मला लाभलं आहे असं सांगत मोदींनी संतांवर स्तुतीसुमनं उधळली. हा देश राजकारण्यांनी बनवला नसून तो संतांनी बनवला आहे. आजपर्यंत संतांनी कधीही कोणाकडे काही मागितले नाही. संतांनी फक्त आशीर्वाद दिला आहे त्यांच्या आशीर्वादामुळे केरळ राज्य आज शिक्षणात अव्वल स्थानावर आहे असं मत मोदींनी व्यक्त केलं. तसंच विरोधक म्हणतात मोदी प्लॅनिंग करून चालतात. पण त्यांचा हा आरोप खोटा आहे. मी कोणतीही प्लॅनिंग केली नाही. मी एक सर्व सामान्य माणूस आहे आणि मला सर्व सामान्य माणसाचे दुख कळते. कारण ती लोकंही छोट्या गावात जन्मली आहे आणि माझा जन्मही एका छोट्या गावात झाला आहे असं सांगत त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना टोला लगावला.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2013 02:04 PM IST

नरेंद्र मोदींनी उधळली रामदेव बाबांवर स्तुतीसुमनं

26 एप्रिल

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज हरिव्दारमध्ये झालेल्या कार्यक्रमात योगगुरू रामदेव बाबांवर स्तुतीसुमनं उधळली. रामदेव बाबा यांचे कार्य महान आहे. त्यांनी देशासह परदेशात योग विद्येचा मोठा प्रसार केला आहे. देशवासियांना त्यांनी स्वस्थ जगण्याचा मंत्रा दिला आहे. मात्र केंद्र सरकारने त्यांनी काळ्या पैशामुद्यावर केलेल्या आंदोलनात अत्याचार केला आहे. असं सांगत मोदींनी सरकारच्या कारवाईचा निषेध व्यक्त करत मोदींनी पंतप्रधानपदाच्या वाटचाली साठी संतांचे आशीर्वाद घेतले. हरिद्वारमध्ये योगगुरू बाबा रामदेव यांनी उभारलेल्या पतंजली योगपीठाच्या नवीन शाळेचं उद्घाटन मोदींच्या हस्ते पार पडलं. यावेळी ते बोलत होते.

आजपर्यंतच्या झालेल्या निवडणुकीत मला ज्यांनी मतं दिली तिही माझी माणसं होती आणि ज्यांनी नाही दिली तिही माझीच माणसं होती. आजही मी त्याच मार्गावर चालत आहे. सगळ्यांना सुख आणि शांती लाभो एवढेच माझे ध्येय आहे अशी भावना मोदी यांनी व्यक्त केली. कुंभ मेळाव्याला येऊ शकलं नाही याची सल मनात कायम आहे. पण आज संतांच्यामध्ये बसण्याचं, त्यांच्या सानिध्यात राहण्याचं भाग्य मला लाभलं आहे असं सांगत मोदींनी संतांवर स्तुतीसुमनं उधळली. हा देश राजकारण्यांनी बनवला नसून तो संतांनी बनवला आहे. आजपर्यंत संतांनी कधीही कोणाकडे काही मागितले नाही. संतांनी फक्त आशीर्वाद दिला आहे त्यांच्या आशीर्वादामुळे केरळ राज्य आज शिक्षणात अव्वल स्थानावर आहे असं मत मोदींनी व्यक्त केलं. तसंच विरोधक म्हणतात मोदी प्लॅनिंग करून चालतात. पण त्यांचा हा आरोप खोटा आहे. मी कोणतीही प्लॅनिंग केली नाही. मी एक सर्व सामान्य माणूस आहे आणि मला सर्व सामान्य माणसाचे दुख कळते. कारण ती लोकंही छोट्या गावात जन्मली आहे आणि माझा जन्मही एका छोट्या गावात झाला आहे असं सांगत त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना टोला लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 26, 2013 02:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close