S M L

माओवाद्यांच्या हल्ल्यात पोलीस निरीक्षकासह 2 जवान ठार

27 एप्रिलछत्तीसगढमधल्या कांकेड जिल्ह्यात माओवाद्यांनी सुरक्षा दलांच्या छावणीवर केलेल्या हल्ल्यात एका पोलीस निरीक्षकासह दोन जवान ठार झाले आहेत. तर दोन जवान जखमी झालेत. शुक्रवारी रात्री ताडोकी पोलीस ठाण्यातून बीएसएफ आणि पोलिसांचे जवान संयुक्तपणे बाहेर पडत होते. त्यावेळी त्यांच्यात आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली. माओवाद्यांच्या या हल्ल्यानंतर परिसरात कोंबिग ऑपरेशन सुरु आहे. अलीकडेच सुरक्षा दलांनी माओवाद्यांविरोधात जोरदार मोहीम सुरू केलीये. त्यामध्ये अनेक माओवादी ठार झालेत. या कारवाईविरोधात माओवाद्यांनी आज देशव्यापी बंद पुकारला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 15, 2013 01:30 PM IST

माओवाद्यांच्या हल्ल्यात पोलीस निरीक्षकासह 2 जवान ठार

27 एप्रिल

छत्तीसगढमधल्या कांकेड जिल्ह्यात माओवाद्यांनी सुरक्षा दलांच्या छावणीवर केलेल्या हल्ल्यात एका पोलीस निरीक्षकासह दोन जवान ठार झाले आहेत. तर दोन जवान जखमी झालेत. शुक्रवारी रात्री ताडोकी पोलीस ठाण्यातून बीएसएफ आणि पोलिसांचे जवान संयुक्तपणे बाहेर पडत होते. त्यावेळी त्यांच्यात आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली. माओवाद्यांच्या या हल्ल्यानंतर परिसरात कोंबिग ऑपरेशन सुरु आहे. अलीकडेच सुरक्षा दलांनी माओवाद्यांविरोधात जोरदार मोहीम सुरू केलीये. त्यामध्ये अनेक माओवादी ठार झालेत. या कारवाईविरोधात माओवाद्यांनी आज देशव्यापी बंद पुकारला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 27, 2013 09:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close