S M L

सरबजीत सिंग कोमात

27 एप्रिललाहोर : पाकिस्तानच्या तुरुंगात असलेला भारतीय कैदी सरबजीत सिंग यांच्यावर झालेल्या मारहणीनंतर डीप कोमामध्ये आहे त्याची प्रकृती स्थिर झाल्याशिवाय त्याच्यावर कोणतीही शस्त्रक्रिया करता येणार नाही, असं परराष्ट्र खात्यामार्फत सांगण्यात आलंय. सरबिजला व्हेन्टिलेटरवर ठेवण्यात आलंय. त्याचे एक्सरे, MRI आणि सीटी स्कॅन करण्यात आले आहे. दरम्यान, पाकिस्तानातल्या भारतीय अधिकार्‍यांनी त्याची लाहोरमधल्या जिना हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. सरबजितवर शुक्रवारी प्राणघातक हल्ला झाला. लाहोरमधल्या कोट लखपत तुरुंगात दोन कैद्यांनी विटा आणि प्लेट्सनं त्यांना बेदम मारहाण केली. यात सरबजीत यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दरम्यान, अफझल गुरूला फाशी दिल्यानंतर काही जणांनी आपल्याला धमकावलं असल्याचं त्यानं पत्रातून कळवलं होतं असं सरबजीतची बहिण दलबीर कौरनं म्हटलं आहे. सरबजीतला भेटण्यासाठी पाकिस्तानला जाण्याची इच्छाही तिनं व्यक्त केली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 15, 2013 01:30 PM IST

सरबजीत सिंग कोमात

27 एप्रिल

लाहोर : पाकिस्तानच्या तुरुंगात असलेला भारतीय कैदी सरबजीत सिंग यांच्यावर झालेल्या मारहणीनंतर डीप कोमामध्ये आहे त्याची प्रकृती स्थिर झाल्याशिवाय त्याच्यावर कोणतीही शस्त्रक्रिया करता येणार नाही, असं परराष्ट्र खात्यामार्फत सांगण्यात आलंय. सरबिजला व्हेन्टिलेटरवर ठेवण्यात आलंय. त्याचे एक्सरे, MRI आणि सीटी स्कॅन करण्यात आले आहे. दरम्यान, पाकिस्तानातल्या भारतीय अधिकार्‍यांनी त्याची लाहोरमधल्या जिना हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. सरबजितवर शुक्रवारी प्राणघातक हल्ला झाला. लाहोरमधल्या कोट लखपत तुरुंगात दोन कैद्यांनी विटा आणि प्लेट्सनं त्यांना बेदम मारहाण केली. यात सरबजीत यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दरम्यान, अफझल गुरूला फाशी दिल्यानंतर काही जणांनी आपल्याला धमकावलं असल्याचं त्यानं पत्रातून कळवलं होतं असं सरबजीतची बहिण दलबीर कौरनं म्हटलं आहे. सरबजीतला भेटण्यासाठी पाकिस्तानला जाण्याची इच्छाही तिनं व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 27, 2013 10:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close