S M L

पेट्रोल 3 रुपयांनी स्वस्त

दोन महिन्यात तब्बल 8 रूपये 25 पैशांनी पेट्रोल झाले स्वस्त30 एप्रिल महागाईने त्रस्त सर्वसामान्यांना पेट्रोलियम कंपन्यांनी आज आणखी एक दिलासा दिला आहे. पेट्रोलच्या दरात 3 रूपयांची घसघशीत कपात करण्यात आली आहे. ही कपात आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. या महिन्यातली ही दुसरी कपात आहे तर गेल्या दोन महिन्यातली चौथी कपात आहे. मागिल महिन्यात 1 मार्च रोजी पेट्रोलच्या दरात 1 रुपया 40 पैशांनी कपात करण्यात आली होती. तर 15 दिवसांनंतर 15 मार्च रोजी 2 रूपयांनी स्वस्त झालं होतं. पेट्रोल स्वस्त होण्याची सुखद मालिका इथेच थांबली नाही. या महिन्याच्या सुरूवातील 1 एप्रिल रोजी पेट्रोल 85 पैशांनी स्वस्त झाले. तर पुन्हा 15 दिवसांनंतर 15 एप्रिल रोजी 1 रूपयांनी आणि आज 3 रूपयांनी पेट्रोल स्वस्त झाले आहे. जर मागिल दोन महिन्याचा हिशेब केला तर 8 रूपये 25 पैशांनी पेट्रोल स्वस्त झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलची किंमत प्रति बॅरल घसरल्यामुळे पेट्रोलच्या दरात कपात करण्यात आल्याचं पेट्रोलियम कंपन्यांनी स्पष्ट केलं. आंतराष्ट्रीय बाजारात क्रुड तेलाच्या दरात झालेली कपात पेट्रोलियम कंपन्यांच्या फायदेशीर तर आहेच सोबत सरकारी सबसिडीही कमी होईल असं सांगितलं जातं आहे. मात्र काहीही असो गेल्या दोन महिन्यात पेट्रोलच्या दरात विक्रमी कपात झाल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई - सध्याचे दर 72.88 रु. ली. नवे दर - 69.88 रु.पुणे सध्याचे दर 73.21 रु. ली. नवे दर - 70.21

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2013 01:28 PM IST

पेट्रोल 3 रुपयांनी स्वस्त

दोन महिन्यात तब्बल 8 रूपये 25 पैशांनी पेट्रोल झाले स्वस्त

30 एप्रिल

महागाईने त्रस्त सर्वसामान्यांना पेट्रोलियम कंपन्यांनी आज आणखी एक दिलासा दिला आहे. पेट्रोलच्या दरात 3 रूपयांची घसघशीत कपात करण्यात आली आहे. ही कपात आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. या महिन्यातली ही दुसरी कपात आहे तर गेल्या दोन महिन्यातली चौथी कपात आहे.

मागिल महिन्यात 1 मार्च रोजी पेट्रोलच्या दरात 1 रुपया 40 पैशांनी कपात करण्यात आली होती. तर 15 दिवसांनंतर 15 मार्च रोजी 2 रूपयांनी स्वस्त झालं होतं. पेट्रोल स्वस्त होण्याची सुखद मालिका इथेच थांबली नाही. या महिन्याच्या सुरूवातील 1 एप्रिल रोजी पेट्रोल 85 पैशांनी स्वस्त झाले. तर पुन्हा 15 दिवसांनंतर 15 एप्रिल रोजी 1 रूपयांनी आणि आज 3 रूपयांनी पेट्रोल स्वस्त झाले आहे. जर मागिल दोन महिन्याचा हिशेब केला तर 8 रूपये 25 पैशांनी पेट्रोल स्वस्त झाले आहे.

त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलची किंमत प्रति बॅरल घसरल्यामुळे पेट्रोलच्या दरात कपात करण्यात आल्याचं पेट्रोलियम कंपन्यांनी स्पष्ट केलं. आंतराष्ट्रीय बाजारात क्रुड तेलाच्या दरात झालेली कपात पेट्रोलियम कंपन्यांच्या फायदेशीर तर आहेच सोबत सरकारी सबसिडीही कमी होईल असं सांगितलं जातं आहे. मात्र काहीही असो गेल्या दोन महिन्यात पेट्रोलच्या दरात विक्रमी कपात झाल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

मुंबई - सध्याचे दर 72.88 रु. ली.

नवे दर - 69.88 रु.

पुणे सध्याचे दर 73.21 रु. ली.

नवे दर - 70.21

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 30, 2013 02:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close