S M L

विदर्भासाठी 50 कोटींचं टुरिझम पॅकेज जाहीर

1 जानेवारी 2009विदर्भासाठी सरकारनं 50 कोटींचं टुरिझम पॅकेज जाहीर केलंय. विदर्भाचा विकास पर्यटनातून करण्यासाठी हे पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे. या पॅकेजमधून विदर्भात वेगवेगळे पर्यटन प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत.26/11च्या मुंबई हल्ल्यानंतर 60 % विदेशी पर्यटक कमी झाले आहेत. त्यामुळे पर्यटन व्यवसायाची फार मोठी हानी झाली आहे. ह्या विदर्भपॅकेजसाठी राज्यसरकार 12 कोटी आणि केंद्र सरकार 36 कोटी देणार आहेत. साधारणत: 50 कोटींचा हा प्रोजेक्ट 2 वर्षापूर्वी राज्य सरकारने केंद्र सरकारसमोर मांडला होता. यापैकी विदर्भातील ताडोबा अभयारण्यावर 10 कोटी खर्च करण्यात येणार आहेत. तसंच पर्यटनाचा विकास करण्यासाठी विदर्भातील 9 ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येणार आहेत अशी माहिती राज्याचे पर्यटन मंत्री विजयसिंह मोहित- पाटील यांनी दिली.परदेशी पर्यटकांना आकषिर्त करण्यासाठी सुरू केलेली डेक्कन ओडिसी ही फाइव्ह स्टार टुरिस्ट ट्रेन विदर्भातून नेण्याचाही यात प्रस्ताव आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 1, 2009 03:41 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 1, 2009 03:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close