S M L

आसाममधल्या 3 स्फोटांत 5 ठार, 51 जखमी

2 जानेवारी, आसामआनंद वेकटेश्वरनदहशतवाद्यांनी पुन्हा एकदा आसामला लक्ष्य केलंआहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी आसामची राजधानी गुवाहाटी इथं कमी क्षमतेचे तीन सिरीयल बॉम्बस्फोट झाले. यात पाचजणांचा बळी गेला आहे. तर 51 जण जखमी झाले आहेत. या स्फोटांमागे उल्फा अतिरेक्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. स्फोटातल्या जखमींना गुवाहटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. 30 ऑक्टोबरच्या बॉम्बस्फोटांनतर अवघ्या दोनच महिन्यात गुवाहाटीत पुन्हा स्फोट घडवण्यात आले आहेत. पहिला स्फोट गुवाहाटीच्या बिरूबारी भागात दुपारी अडीच वाजता झाला. भूतनाथमधल्या छोट्या बाजारात त्यांनंतरचा स्फोट झाला. आणि तिसरा स्फोट बिग बाजारमध्ये घडवण्यात आला. सध्याचे केंद्रीय गृहमंत्री आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिंदबरम यांचा असाम मधल्या कायदा - सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आसाम दौरा होता. काल संध्याकाळी ते भूतनाथ मार्केटमध्ये येणार होते. ते येण्यापूर्वीच संध्याकाळी 4.00 च्या सुमारास स्फोट घडवून आणले आहेत. बांग्लादेशच्या शेख हसीना यांच्या दहशतवादाविरोधातील प्रस्तावानंतर लगेचच दुसर्‍या दिवशी हे स्फोट झाले आहेत. या स्फोटांमागं उल्फा अतिरेकी असल्याचाच संशय व्यक्त करण्या येतोय. मृणाल हजारिकाच्या शांततामय तोडग्याला उल्फाच्या ब्रेव्हो युनिटचा विरोध आहे. याच ग्रुपनं 30 ऑक्टोबरचे बॉम्बस्फोट घडवून आणले होते. केंद्रीय गृहमंत्र्यांनी आसामच्या मुख्यंमंत्र्यांना, बांग्लादेशवर अतिरेक्यांच्या कारवाईप्रश्नी दबाव आणला जाईल असं अश्वासन दिलं आहे. " सुरक्षा व्यवस्था थोडी ढिसाळ झाली आहे. सुरक्षाव्यवस्थेत अत्याधुनिक यंत्रणाचा वापर करण्यात येईल, असा दिलासा आसामचे मुख्यमंत्री तरूण गोगोई यांनी दिला आहे. गेल्या दोन महिन्यात, आसाममध्ये सुमारे 100 हून अधिकजणाचा मृत्यू दहशतवादी कारवायात झाला आहे. राज्य तसच केंद्र सरकार सुरक्षा पुरवण्यात आपयशी ठरल.विशेष म्हणजे रा़ष्ट्रीय सुरक्षा संस्थेची स्थापना होऊनही हा प्रकार घडला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 2, 2009 03:57 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 2, 2009 03:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close