S M L

अश्वनीकुमार-बन्सल यांची हकालपट्टी

Sachin Salve | Updated On: May 11, 2013 02:01 PM IST

 अश्वनीकुमार-बन्सल यांची हकालपट्टी

bansal and aswinkumar

अश्वनीकुमार-बन्सल यांची हकालपट्टी

नवी दिल्ली 10 मे : रेल्वे बढतीत लाचखोरीप्रकरणी रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल आणि कोळसा घोटाळ्याप्रकरणी कायदा मंत्री अश्वनीकुमार यांची अखेर हकालपट्टी झालीय. बढती घोटाळा उघडकीला आल्यानंतर गेल्या काही दिवसांच्या नाट्यानंतर अखेर काँग्रेसनं त्यांचा राजीनामा घेतला. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यात आज चर्चा झाली. आणि त्यानंतर बन्सल यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले गेले. कर्नाटकमधील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे हे नवे रेल्वेमंत्री होऊ शकतात अशी सूत्रांची माहिती आहे. तर  अश्वनीकुमार यांच्याबाबतही कडक निर्णय घ्या असं सोनियांनी पंतप्रधानांना सुचना दिल्या त्यानंतर अश्वनीकुमार यांनी पंतप्रधानांकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. सोनिया गांधी यांनी कडक भूमिका घेत दोन्ही केंद्रीय मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवला आहे.

रेल्वेतल्या कॅश फॉर प्रमोशन घोटाळ्यात अखेर पवनकुमार बन्सल यांना आपलं पद गमवावं लागलं. शुक्रवारी संध्याकाळी पंतप्रधान आणि सोनिया गांधी यांच्या बैठकीनंतर बन्सल यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले गेले. आणि त्यानंतर बन्सल यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊन राजीनामा दिला.

गेल्या शुक्रवारी बन्सल यांचा भाचा विजय सिंघला लाचखोरी प्रकरणात सीबीआयच्या जाळ्यात सापडला आणि बन्सल अडचणीत आले. रेल्वे अधिकारी महेशकुमार यांना चांगलं पद हवं होतं. ते मिळवून देण्यासाठी सिंघला यानं महेशकुमारकडे 2 कोटींची लाच मागितली. त्यातला 90 लाखांचा पहिला हप्ता स्वीकारताना सिंघला याला चंदिगडमध्ये अटक झाली.

 

संसदेच्या बजेट अधिवेशनाचा गेला आठवडा बन्सल आणि कायदा मंत्री अश्वनीकुमार यांच्या राजीनाम्यावरूनच गाजला. इतकं सगळं होऊनही पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी बन्सल यांना शेवटपर्यंत वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्यात ते अयशस्वी ठरले

असा घडला घोटाळा!

 

- बन्सल यांचे खासगी सचिव राहुल भंडारीही चौकशीच्या फेर्‍यात अडकले

- बुधवारी आणि गुरुवारी सीबीआयनं भंडारी यांची चौकशी केली

- हा रेल्वे घोटाळ्याची धग बन्सल यांच्यापर्यंत पोचली

- त्यांनी बुधवारपासून आपल्या ऑफिसमध्येच जाणं बंद केलं

- गुरुवारच्या कॅबिनेट बैठकीतही ते गैरहजर राहिले

- बन्सल यांच्या कौटुंबीक मालकीच्या फार्मा कंपनीनं 5 वर्षांत 152 कोटींची उलाढाल गाठली

- बन्सल यांची पत्नी आणि दोन मुलांच्या नावे ही कंपनी आहे

- कंपनीच्या या भरभराटीबद्दलही आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय

बन्सल यांची राजकीय कारकीर्द

- चंदीगड मतदार संघातून काँग्रेसचं प्रतिनिधित्व

- 2004 आणि 2009 ची लोकसभा निवडणूक चंदिगडमधून जिंकली

- यूपीए-1 मध्ये अर्थ राज्यमंत्री आणि संसदीय कामकाज मंत्रिपद सांभाळलं

- सध्याच्या लोकसभेत संसदीय कामकाज आणि जलसंधारण मंत्रिपद सांभाळलं

- तृणमूल काँग्रेसनं यूपीएचा पाठिंबा काढल्यानंतर बन्सल रेल्वेमंत्री झाले

- पदभार सांभाळताच त्यांनी रेल्वे भाडेवाढ करण्याचा धाडसी निर्णय घेतला

बन्सल कुटुंबीयांची भरभराट

- बन्सल यांच्या मालकीची थिऑन फार्मा ही कंपनी आहे

- 2007 मध्ये कंपनीची कंपनीची उलाढाल शून्य होती

- 2005 मध्ये या कंपनीची स्थापना झाली

- पवनकुमार बन्सल 2006मध्ये केंद्रात राज्यमंत्री बनले

- बन्सल यांचे मुलगे अमित आणि मनिष या कंपनीत संचालक आहेत

- 2008 मध्ये कंपनीनं 15 कोटी 35 लाख रुपयांची उलाढाल दाखवली होती

- 2009 मध्ये बन्सल संसदीय कामकाज मंत्री झाले

- त्यावर्षी कंपनीची उलाढाल 41 कोटी 74 लाख झाली

- 2012 मध्ये कंपनीची उलाढाल 152 कोटींपर्यंत गेली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 11, 2013 02:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close