S M L

'SBI सह 23 बँकां मनी लाँडरिंगमध्ये'

06 मेदेशातील खाजगी क्षेत्रातील प्रमुख आयसीआयसीआय, एचडीएफसी, एक्सीस बँकाचा काळ्या पैशाच्या पांढरा करण्याचा भांडाफोड करणार्‍या 'कोब्रापोस्ट'ने आज आणखी एक गौप्यस्फोट केला. देशातील 23 बँका आणि विमा कंपन्या मनी लाँडरिंगमध्ये गुंतलेल्या असल्याचा आरोप कोब्रापोस्ट या वेबसाईटने केला आहे. या बँकांमध्ये जास्त करून सार्वजनिक बँकांचा समावेश आहे. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, आयडीबीआय, ओरिएंटल बँक, देना बँक यांचीही नावं कोब्रापोस्टनं जाहीर केला. कोब्रापोस्टचे संपादक अनिरुद्ध बहल यांनी एक पत्रकार परिषद घेऊन हे आरोप केले. दोन महिन्यांपूर्वी कोब्रापोस्टनं खाजगी क्षेत्रातल्या काही बँकांवर मनी लाँडरिंगचे आरोप केले होते. त्या बँकांना सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोपही बहल यांनी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: May 15, 2013 12:29 PM IST

'SBI सह 23 बँकां मनी लाँडरिंगमध्ये'

06 मे

देशातील खाजगी क्षेत्रातील प्रमुख आयसीआयसीआय, एचडीएफसी, एक्सीस बँकाचा काळ्या पैशाच्या पांढरा करण्याचा भांडाफोड करणार्‍या 'कोब्रापोस्ट'ने आज आणखी एक गौप्यस्फोट केला. देशातील 23 बँका आणि विमा कंपन्या मनी लाँडरिंगमध्ये गुंतलेल्या असल्याचा आरोप कोब्रापोस्ट या वेबसाईटने केला आहे.

या बँकांमध्ये जास्त करून सार्वजनिक बँकांचा समावेश आहे. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, आयडीबीआय, ओरिएंटल बँक, देना बँक यांचीही नावं कोब्रापोस्टनं जाहीर केला.

कोब्रापोस्टचे संपादक अनिरुद्ध बहल यांनी एक पत्रकार परिषद घेऊन हे आरोप केले. दोन महिन्यांपूर्वी कोब्रापोस्टनं खाजगी क्षेत्रातल्या काही बँकांवर मनी लाँडरिंगचे आरोप केले होते. त्या बँकांना सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोपही बहल यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 6, 2013 09:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close