S M L

'ड्रॅगन' परतला, भारताचीही माघार

06 मेलडाख : गेली 20 दिवस चीन आणि भारतामध्ये सीमेवर घुसखोरीमुळे तणाव निर्माण झाला होता तो अखेर निवळला आहे. चीननं 15 एप्रिलला लडाखमधल्या दौलत बेग ओल्डी या भागात घुसखोरी केली होती. पण, आता या भागातून चीन आणि भारताच्या दोन्ही सैन्यांनी माघार घेतली आहे. दोन्ही देशांमध्ये वरिष्ठ स्तरावर झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. रविवारी संध्याकाळी साडे सात वाजता दोन्ही सैन्यांनी माघार घेतली. चीनच्या सैन्याने लडाखमधून माघार घेणं हे भारताच्या मुत्सद्देगिरीचं यश मानलं जातंय. 15 एप्रिलला चीननं भारताच्या सीमारेषेत तब्बल 19 किलोमीटर भागात घुसखोरी करून 5 छावण्या उभ्या केल्या होत्या. भारताने खबरदारी घेत चीनच्या छावण्यापासून काही अंतरावर छावणी तयार केली होती. त्यामुळे दोन्ही देशात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर दोन्ही देशांतल्या कमांडर्समध्ये दोन फ्लॅग बैठका झाल्या. पण, त्या निष्फळ ठरल्या होत्या. यावर तोडगा काढण्यासाठी सलमान खुर्शीद चीनला जाणार होते मात्र विरोधाकांच्या टीकेमुळे त्यांचा दौरा रद्द करण्यात आला होता. या प्रकरणावर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी हे प्रकरण स्थानिक असून त्याबद्दल चिंता करण्याचं कारण नाही अशी मत व्यक्त केले होते. पंतप्रधानांच्या वक्तव्यामुळे विरोधकांनी एकच गदारोळ केला होता. पण, अखेर या मुद्द्यावर तोडगा काढण्यात दोन्ही देशांना यश मिळालं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 6, 2013 10:29 AM IST

'ड्रॅगन' परतला, भारताचीही माघार

06 मे

लडाख : गेली 20 दिवस चीन आणि भारतामध्ये सीमेवर घुसखोरीमुळे तणाव निर्माण झाला होता तो अखेर निवळला आहे. चीननं 15 एप्रिलला लडाखमधल्या दौलत बेग ओल्डी या भागात घुसखोरी केली होती. पण, आता या भागातून चीन आणि भारताच्या दोन्ही सैन्यांनी माघार घेतली आहे. दोन्ही देशांमध्ये वरिष्ठ स्तरावर झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. रविवारी संध्याकाळी साडे सात वाजता दोन्ही सैन्यांनी माघार घेतली. चीनच्या सैन्याने लडाखमधून माघार घेणं हे भारताच्या मुत्सद्देगिरीचं यश मानलं जातंय.

15 एप्रिलला चीननं भारताच्या सीमारेषेत तब्बल 19 किलोमीटर भागात घुसखोरी करून 5 छावण्या उभ्या केल्या होत्या. भारताने खबरदारी घेत चीनच्या छावण्यापासून काही अंतरावर छावणी तयार केली होती. त्यामुळे दोन्ही देशात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर दोन्ही देशांतल्या कमांडर्समध्ये दोन फ्लॅग बैठका झाल्या.

पण, त्या निष्फळ ठरल्या होत्या. यावर तोडगा काढण्यासाठी सलमान खुर्शीद चीनला जाणार होते मात्र विरोधाकांच्या टीकेमुळे त्यांचा दौरा रद्द करण्यात आला होता. या प्रकरणावर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी हे प्रकरण स्थानिक असून त्याबद्दल चिंता करण्याचं कारण नाही अशी मत व्यक्त केले होते. पंतप्रधानांच्या वक्तव्यामुळे विरोधकांनी एकच गदारोळ केला होता. पण, अखेर या मुद्द्यावर तोडगा काढण्यात दोन्ही देशांना यश मिळालं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 6, 2013 10:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close