S M L

पंतप्रधान आणि सोनिया गांधींमध्येच मतभेद

पल्लवी घोष, नवी दिल्ली07 मेनवी दिल्ली : भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून काँग्रेसची चोहोबाजूंनी कोंडी झालीय. संसदेत विरोधक आक्रमक आहेत तर पक्षातही मतभेद आहेत. पी. के. बन्सल आणि अश्वनीकुमार यांच्या राजीनाम्यावरून हे मतभेद झाल्याचं कळतं. या मुद्द्यांवर पंतप्रधानांनी मीडियाशी बोलावं असं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींना वाटतंय. पण, पंतप्रधानांना ते मान्य नाही. दरम्यान संसदेतल्या कोंडीवर तोडगा काढण्यासाठी सरकारची विरोधकांशी पडद्याआडून चर्चा सुरू झालीय.काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि लोकसभेतल्या विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांची सेंट्रल हॉलमध्ये भेट झाली. भाजपने अनंतकुमार यांच्याकडे चर्चेची जबाबदारी सोपवलीय. त्यांनी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांशी चर्चा केली.गेली 9 वर्षं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सतत पंतप्रधान मनमोहन सिंग यांची पाठराखण केली. पण, आता या दोघांमधले संबंध काहीसे तणावपूर्ण बनलेत. त्याला कारण ठरलेत हे दोन मंत्री... पवन कुमार बंसल आणि अश्वनी कुमार...याला सुरुवात झाली 3 आठवड्यांपूर्वी...कोळसा घोटाळ्याच्या सीबीआय चौकशी अहवालात कायदा मंत्री अश्वनी कुमार यांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप झाला. यावर तोडगा काढण्यासाठी यूपीएनं बैठक बोलवली आणि या बैठकीत पंतप्रधान भक्कमपणे अश्वनीकुमार यांच्या पाठिशी उभे राहिले. त्यानंतर काही दिवसातच रेल्वे मंत्री पवनकुमार बंसल यांच्या भाच्याने रेल्वेत बढतीसाठी लाच घेतल्याचा आरोप झाला. त्यावेळीही बंसल यांचा राजीनामा घ्यावा, असं काँग्रेस नेत्यांचं म्हणणं होतं. पण, पंतप्रधानांनी मौन बाळगलं. भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून चहुबाजूंनी कोंडी झाल्यावर रणनीतीचा भाग म्हणून काँग्रेसनं सोमवारी संसदेत अन्न सुरक्षा विधेयक मांडलं. काँग्रेसचं डॅमेज कंट्रोल- संसदेत अन्न सुरक्षा विधेयक आणि भूसंपादन विधेयक सादर करून आपण लोकाभिमुख असल्याचं सांगण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे - आणि भाजप लोकहिताच्या आड येतेय, असं दाखवण्याचाही काँग्रेसचा प्रयत्न आहे- शरद पवार यांनी समाजवादी पक्ष आणि डाव्या पक्षांशी चर्चा केली. भाजपला एकाकी पाडण्याची ही काँग्रेसची खेळी मानली जातेय - अन्न सुरक्षा विधेयक चर्चा करूनच मंजूर करावं, ही विरोधकांची मागणी पवारांनी पंतप्रधानांपर्यंत पोचवलीय - त्यातच काँग्रेसने भाजपबरोबरच पडद्याआडून चर्चा चालवलीय. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये ही बैठक झालीटू जी घोटाळ्याच्या गंभीर आरोपानंतरही काँग्रेसने हिमाचल प्रदेशात घवघवीत यश मिळवलं आणि आता रेल्वे आणि कोळसा घोटाळ्यांच्या आरोपांनंतरही कर्नाटकात मोठ्या विजयाची काँग्रेसला आशा आहे. काँग्रेसमधल्या या फुटीमुळे 2 सत्ताकेंद्राचा प्रयोग किती कमजोर आहे, हे सिद्ध झालंय. पण, जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचं म्हणजे घोटाळ्यांच्या या राजकारणामुळे संसदेचं कामकाज मात्र पूर्णपणे ठप्प झालंय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 11, 2013 03:59 PM IST

पंतप्रधान आणि सोनिया गांधींमध्येच मतभेद

पल्लवी घोष, नवी दिल्ली

07 मे

नवी दिल्ली : भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून काँग्रेसची चोहोबाजूंनी कोंडी झालीय. संसदेत विरोधक आक्रमक आहेत तर पक्षातही मतभेद आहेत. पी. के. बन्सल आणि अश्वनीकुमार यांच्या राजीनाम्यावरून हे मतभेद झाल्याचं कळतं. या मुद्द्यांवर पंतप्रधानांनी मीडियाशी बोलावं असं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींना वाटतंय. पण, पंतप्रधानांना ते मान्य नाही.

दरम्यान संसदेतल्या कोंडीवर तोडगा काढण्यासाठी सरकारची विरोधकांशी पडद्याआडून चर्चा सुरू झालीय.काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि लोकसभेतल्या विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांची सेंट्रल हॉलमध्ये भेट झाली. भाजपने अनंतकुमार यांच्याकडे चर्चेची जबाबदारी सोपवलीय. त्यांनी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांशी चर्चा केली.

गेली 9 वर्षं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सतत पंतप्रधान मनमोहन सिंग यांची पाठराखण केली. पण, आता या दोघांमधले संबंध काहीसे तणावपूर्ण बनलेत. त्याला कारण ठरलेत हे दोन मंत्री... पवन कुमार बंसल आणि अश्वनी कुमार...

याला सुरुवात झाली 3 आठवड्यांपूर्वी...कोळसा घोटाळ्याच्या सीबीआय चौकशी अहवालात कायदा मंत्री अश्वनी कुमार यांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप झाला. यावर तोडगा काढण्यासाठी यूपीएनं बैठक बोलवली आणि या बैठकीत पंतप्रधान भक्कमपणे अश्वनीकुमार यांच्या पाठिशी उभे राहिले. त्यानंतर काही दिवसातच रेल्वे मंत्री पवनकुमार बंसल यांच्या भाच्याने रेल्वेत बढतीसाठी लाच घेतल्याचा आरोप झाला. त्यावेळीही बंसल यांचा राजीनामा घ्यावा, असं काँग्रेस नेत्यांचं म्हणणं होतं. पण, पंतप्रधानांनी मौन बाळगलं. भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून चहुबाजूंनी कोंडी झाल्यावर रणनीतीचा भाग म्हणून काँग्रेसनं सोमवारी संसदेत अन्न सुरक्षा विधेयक मांडलं.

काँग्रेसचं डॅमेज कंट्रोल- संसदेत अन्न सुरक्षा विधेयक आणि भूसंपादन विधेयक सादर करून आपण लोकाभिमुख असल्याचं सांगण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे - आणि भाजप लोकहिताच्या आड येतेय, असं दाखवण्याचाही काँग्रेसचा प्रयत्न आहे- शरद पवार यांनी समाजवादी पक्ष आणि डाव्या पक्षांशी चर्चा केली. भाजपला एकाकी पाडण्याची ही काँग्रेसची खेळी मानली जातेय - अन्न सुरक्षा विधेयक चर्चा करूनच मंजूर करावं, ही विरोधकांची मागणी पवारांनी पंतप्रधानांपर्यंत पोचवलीय - त्यातच काँग्रेसने भाजपबरोबरच पडद्याआडून चर्चा चालवलीय. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये ही बैठक झाली

टू जी घोटाळ्याच्या गंभीर आरोपानंतरही काँग्रेसने हिमाचल प्रदेशात घवघवीत यश मिळवलं आणि आता रेल्वे आणि कोळसा घोटाळ्यांच्या आरोपांनंतरही कर्नाटकात मोठ्या विजयाची काँग्रेसला आशा आहे.

काँग्रेसमधल्या या फुटीमुळे 2 सत्ताकेंद्राचा प्रयोग किती कमजोर आहे, हे सिद्ध झालंय. पण, जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचं म्हणजे घोटाळ्यांच्या या राजकारणामुळे संसदेचं कामकाज मात्र पूर्णपणे ठप्प झालंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 7, 2013 04:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close