S M L

कर्नाटकमध्ये मतमोजणीला सुरूवात

08 मेकर्नाटकमध्ये कुणाची सत्ता येणार, हे आता काही तासातच स्पष्ट होईल. कर्नाटक विधानसभेच्या 223 जागांसाठी आज मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत तब्बल 2,940 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. कर्नाटकात यावेळी 69 टक्के असं रेकॉर्डब्रेक मतदान झालंय. काँग्रेस, भाजप, धर्मनिरपेक्षा जनता दल आणि कर्नाटक जनता पार्टी अशी चौरंगी लढत कर्नाटकात आहे. पहिल्यांदाच निवडणूक लढवणार्‍या येडियुरप्पा यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे. तर निवडणूकपूर्व सर्व्हेनुसार काँग्रेसची सरशी होईल असं दिसतं. सीएनएन आयबीएन आणि सीएसडीएसनं एप्रिलच्या मध्यात निवडणूकपूर्व सर्वे केला होता. त्यानंतरच्या प्रचाराच्या धुमाळीत संभाव्य निकाल बदलेलत. एक नजर टाकूया, सुधारित संभाव्य निकालावर...संभाव्य निकालकाँग्रेस - 100 - 116भाजप - 43 - 53जेडीएस - 43- 53इतर - 16 - 24संभाव्य निकाल बदलामागची मुख्य 6 कारणं- काँग्रेसकडून सदोष उमेदवारांची निवड, त्यामुळे पक्षात नाराजी आहे. याशिवाय काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांना पक्षातूनच विरोधाचा सामना करावा लागला. - काँग्रेसच्या बड्या नेत्यांमधले अंतर्गत वाद आणि योजनाबद्ध प्रचाराचा अभाव- बंगळुरू ग्रामीण आणि दक्षिण कर्नाटकात वोक्कलिगा समाजाची मत जेडीएसबरोबर गेली- उत्तर कर्नाटकात लिंगायत मतं भाजप आणि केजेपीमध्ये विखुरली. त्याचा फायदा काँग्रेसला झाला- कोस्टल कर्नाटकमध्ये भाजपविरोधातल्या डबल अँटी इन्कम्बन्सीचा काँग्रेसला फायदा. या भागात भाजप सरकार आणि भाजप आमदारांविरोधात लोकांमध्ये असंतोष आहे.- अधिक मतदान हे बदलाचं, सत्ताविरोधी लाटेचं प्रतिक मानलं जातं.

आईबीएन लोकमत | Updated On: May 11, 2013 03:59 PM IST

कर्नाटकमध्ये मतमोजणीला सुरूवात

08 मे

कर्नाटकमध्ये कुणाची सत्ता येणार, हे आता काही तासातच स्पष्ट होईल. कर्नाटक विधानसभेच्या 223 जागांसाठी आज मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत तब्बल 2,940 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. कर्नाटकात यावेळी 69 टक्के असं रेकॉर्डब्रेक मतदान झालंय. काँग्रेस, भाजप, धर्मनिरपेक्षा जनता दल आणि कर्नाटक जनता पार्टी अशी चौरंगी लढत कर्नाटकात आहे. पहिल्यांदाच निवडणूक लढवणार्‍या येडियुरप्पा यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे. तर निवडणूकपूर्व सर्व्हेनुसार काँग्रेसची सरशी होईल असं दिसतं.

सीएनएन आयबीएन आणि सीएसडीएसनं एप्रिलच्या मध्यात निवडणूकपूर्व सर्वे केला होता. त्यानंतरच्या प्रचाराच्या धुमाळीत संभाव्य निकाल बदलेलत. एक नजर टाकूया, सुधारित संभाव्य निकालावर...

संभाव्य निकालकाँग्रेस - 100 - 116भाजप - 43 - 53जेडीएस - 43- 53इतर - 16 - 24

संभाव्य निकाल बदलामागची मुख्य 6 कारणं

- काँग्रेसकडून सदोष उमेदवारांची निवड, त्यामुळे पक्षात नाराजी आहे. याशिवाय काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांना पक्षातूनच विरोधाचा सामना करावा लागला. - काँग्रेसच्या बड्या नेत्यांमधले अंतर्गत वाद आणि योजनाबद्ध प्रचाराचा अभाव- बंगळुरू ग्रामीण आणि दक्षिण कर्नाटकात वोक्कलिगा समाजाची मत जेडीएसबरोबर गेली- उत्तर कर्नाटकात लिंगायत मतं भाजप आणि केजेपीमध्ये विखुरली. त्याचा फायदा काँग्रेसला झाला- कोस्टल कर्नाटकमध्ये भाजपविरोधातल्या डबल अँटी इन्कम्बन्सीचा काँग्रेसला फायदा. या भागात भाजप सरकार आणि भाजप आमदारांविरोधात लोकांमध्ये असंतोष आहे.- अधिक मतदान हे बदलाचं, सत्ताविरोधी लाटेचं प्रतिक मानलं जातं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 7, 2013 07:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close