S M L

कर्नाटकात काँग्रेसची सत्ता, कमळ कोमजले

08 मेकर्नाटक: भ्रष्टाचाराच्या चिखलात रूतलेलं 'कमळ' जनतेनं साफ नाकारलंय आणि काँग्रेसच्या 'हातात' सत्ता दिली आहे. आज कर्नाटक विधानसभेचा निकाल जाहीर झाला आणि अपेक्षेप्रमाणे काँग्रेसने आघाडी घेत एकहाती सत्ता काबीज केलीय. काँग्रेसला 121 जागा मिळवल्या आहे. बहुमतासाठी 112 जागांची आवश्यकता होती. पण काँग्रेसने बहुमताचा आकडा पार करत 121 जागांवर मजल मारली. तर सत्तारूढ भाजपला चांगलेच भगदाड पडले आहे. भाजपला फक्त 40 जागा जिंकता आल्या. तर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या जेडीएस पक्षाने 40 जागा जिंकत विरोधी पक्षाच्या बाकावर बसण्याची तयारी दर्शवली आहे. कर्नाटकात विधानसभेच्या 224 पैकी 223 जागांसाठी मतदान झाले होते. म्हैसूरमधील प्रियाकोटी मतदारसंघात भाजप उमेदवाराचा मृत्यू झाल्यानं तिथली निवडणूक पुढं ढकलण्यात आली. बहुमतासाठी 112 जागांचा आकडा पार करून कर्नाटकात काँग्रेस सरकार स्थापन करणार हे स्पष्ट झालंय. भाजपचा पराभव होण्यात भाजपचे बंडखोर नेते येडियुरप्पा यांच्या केजेपी पक्षाचा मोठा हात आहे. अनेक ठिकाणी केजेपीच्या उमेदवारांनी मतं खाल्ल्यामुळे भाजपचे उमेदवारांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. त्याहूनही विशेष म्हणजे भाजपमध्ये अंतर्गत वाद. भाजपमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्यामुळे पराभवासाठी आणखी एक कारण आपोआप तयार झाले. भाजपच्या या पराभवावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी चुपी साधली आहे. या निवडणुकीत फक्त 39 जागा मिळवत सत्ताधारी भाजप तिसर्‍या स्थानावर गडगडलाय. भाजपनं पराभव मान्य केला. येडियुरप्पांमुळे गेल्या वेळेस विजय मिळाला होता. त्यामुळे त्यांना पुन्हा पक्षात घ्यावं अशी मागणी आता भाजपमधला एक गट दबक्या आवाजत करू लागलाय. दक्षिण कर्नाटकाच्या बालेकिल्ल्यात जेडीएसनं चांगलं यश मिळवलंय. दरम्यान, कर्नाटकमधल्या भाजपच्या विजयाचं श्रेय पंतप्रधानांनी राहुल गांधींना दिलंय. भाजपाच्या भ्रष्टाचाराला कर्नाटकच्या जनतेने नाकारलंय, असं ते म्हणालेत. मतदारांनी भाजपाच्या विचारसरणीला नाकारलं, असं म्हणत त्यांनी नरेंद्र मोदींवरही तोफ डागली. पराभूत झालेले भाजपचे मंत्री- ई. एस. ईश्वरप्पा, उपमुख्यमंत्री- बी. एन. बचेगौडा, कामगार मंत्री - व्ही. सोमण्णा, गृहनिर्माण मंत्री - ए. नारायण स्वामी, समाज कल्याण मंत्री - सोगादू शिवण्णा, पर्यावरण मंत्री - एस. के. बेरुब्बी, कृषी आणि पणन मंत्री- कलकप्पा बंडी, महिला आणि बालकल्याण मंत्री- एस. ए. रवींद्रनाथा, वाणिज्य मंत्री- एस. ए. रामदास, वैद्यकीय शिक्षण मंत्री- आनंद असनोटीकर, मत्स्यविकास मंत्री- शोभा करंदलाजे, ऊर्जा मंत्री- एम. पी. रेणुकाचार्य, अर्थमंत्रीसर्वच भागात भाजप धुव्वा- शहरी आणि निमशहरी भागात काँग्रेसची सरशी- लिंगायत पट्‌ट्यात केजीपीला सर्वाधिक फायदा- दक्षिण कर्नाटकात जेडीएसला सर्वाधिक फायदाकाँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेचकर्नाटकात बहुमत मिळवून काँग्रेस सरकार स्थापन करणार हे स्पष्ट झाल्यानंतर काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेनं जोर धरला आहे. के. सिद्दरामय्या, जी. परमेश्वर आणि केंद्रीय मंत्री मल्लिकार्जुन खरगे ही नावं आघाडीवर आहेत. त्यातही जी परमेश्वर हे स्वतः पिछाडीवर असल्याचं आतापर्यंतच्या निकालावरून दिसतंय. के. सिद्दरामय्या यांच्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी फारशा अनुकूल नाहीत. त्यामुळे मल्लिकार्जून खरगे यांचंच नाव मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर आहे.मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच______________________________________- एस. सिद्धरामय्याबलस्थान- प्रभावशाली मागासवर्गीय नेते उणिवा- 2006मध्ये काँग्रेसमध्ये आल्याने बाहेरचे नेते अशी ओळख______________________________________- मल्लिकार्जुन खरगेबलस्थान- एस. एम. कृष्णांनंतरचे सर्वात ज्येष्ठ नेते- प्रभावशाली दलित नेते- गांधी कुटुंबीयांचे निकटवर्तीयउणिवा- केंद्रात मंत्री असल्यानं नाव वगळलं जाऊ शकतं- फारसे लोकप्रिय नाही______________________________________ - डॉ. जी. परमेश्वराबलस्थान- उच्च शिक्षित- शहरी मतदारांवर प्रभाव पाडण्याची क्षमता- गांधी कुटुंबीयांचे निकटवर्तीयउणिवा- अनेक ज्येष्ठ नेत्यांना नामंजूर- मागासवर्गीय मतदारांमध्ये प्रभाव नाही______________________________________ वीरप्पा मोईलीबलस्थान- राज्यातल्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक- प्रशासकीय कामकाजाचा दीर्घ अनुभव- स्वच्छ प्रतिमाउणिवा- आमदारांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता कमी- जनाधार आणि जातीचा आधार नाही_________________________________एस. एम. कृष्णाबलस्थान- पक्षातले सर्वात ज्येष्ठ नेते- प्रशासकीय कामकाजाचा प्रदीर्घ अनुभवउणिवा- वय मुख्यमंत्रीपदाआड येऊ शकतं- जुन्या म्हैसूर भागातून पक्षांतर्गत विरोध_________________________________के. एच. मुनियप्पाबलस्थान- जेडीएस, केजेपी या पक्षांशी जवळचे संबंध- तरुण दलित चेहराउणिवा- संपूर्ण कर्नाटकात छाप नाहीकर्नाटक विधानसभेचा निकाल 2013 काँग्रेस भाजप जेडीएस केजेपी इतर एकूण 223/112(M) 121 40 40 06 16 223 #KarnatakaResults #KarnatakaElections

आईबीएन लोकमत | Updated On: May 11, 2013 03:32 PM IST

कर्नाटकात काँग्रेसची सत्ता, कमळ कोमजले

08 मे

कर्नाटक: भ्रष्टाचाराच्या चिखलात रूतलेलं 'कमळ' जनतेनं साफ नाकारलंय आणि काँग्रेसच्या 'हातात' सत्ता दिली आहे. आज कर्नाटक विधानसभेचा निकाल जाहीर झाला आणि अपेक्षेप्रमाणे काँग्रेसने आघाडी घेत एकहाती सत्ता काबीज केलीय. काँग्रेसला 121 जागा मिळवल्या आहे. बहुमतासाठी 112 जागांची आवश्यकता होती. पण काँग्रेसने बहुमताचा आकडा पार करत 121 जागांवर मजल मारली. तर सत्तारूढ भाजपला चांगलेच भगदाड पडले आहे. भाजपला फक्त 40 जागा जिंकता आल्या. तर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या जेडीएस पक्षाने 40 जागा जिंकत विरोधी पक्षाच्या बाकावर बसण्याची तयारी दर्शवली आहे.

कर्नाटकात विधानसभेच्या 224 पैकी 223 जागांसाठी मतदान झाले होते. म्हैसूरमधील प्रियाकोटी मतदारसंघात भाजप उमेदवाराचा मृत्यू झाल्यानं तिथली निवडणूक पुढं ढकलण्यात आली. बहुमतासाठी 112 जागांचा आकडा पार करून कर्नाटकात काँग्रेस सरकार स्थापन करणार हे स्पष्ट झालंय. भाजपचा पराभव होण्यात भाजपचे बंडखोर नेते येडियुरप्पा यांच्या केजेपी पक्षाचा मोठा हात आहे. अनेक ठिकाणी केजेपीच्या उमेदवारांनी मतं खाल्ल्यामुळे भाजपचे उमेदवारांना पराभवाचे तोंड पाहावे लागले.

त्याहूनही विशेष म्हणजे भाजपमध्ये अंतर्गत वाद. भाजपमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्यामुळे पराभवासाठी आणखी एक कारण आपोआप तयार झाले. भाजपच्या या पराभवावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी चुपी साधली आहे. या निवडणुकीत फक्त 39 जागा मिळवत सत्ताधारी भाजप तिसर्‍या स्थानावर गडगडलाय. भाजपनं पराभव मान्य केला.

येडियुरप्पांमुळे गेल्या वेळेस विजय मिळाला होता. त्यामुळे त्यांना पुन्हा पक्षात घ्यावं अशी मागणी आता भाजपमधला एक गट दबक्या आवाजत करू लागलाय. दक्षिण कर्नाटकाच्या बालेकिल्ल्यात जेडीएसनं चांगलं यश मिळवलंय.

दरम्यान, कर्नाटकमधल्या भाजपच्या विजयाचं श्रेय पंतप्रधानांनी राहुल गांधींना दिलंय. भाजपाच्या भ्रष्टाचाराला कर्नाटकच्या जनतेने नाकारलंय, असं ते म्हणालेत. मतदारांनी भाजपाच्या विचारसरणीला नाकारलं, असं म्हणत त्यांनी नरेंद्र मोदींवरही तोफ डागली.

पराभूत झालेले भाजपचे मंत्री

- ई. एस. ईश्वरप्पा, उपमुख्यमंत्री- बी. एन. बचेगौडा, कामगार मंत्री - व्ही. सोमण्णा, गृहनिर्माण मंत्री - ए. नारायण स्वामी, समाज कल्याण मंत्री - सोगादू शिवण्णा, पर्यावरण मंत्री - एस. के. बेरुब्बी, कृषी आणि पणन मंत्री- कलकप्पा बंडी, महिला आणि बालकल्याण मंत्री- एस. ए. रवींद्रनाथा, वाणिज्य मंत्री- एस. ए. रामदास, वैद्यकीय शिक्षण मंत्री- आनंद असनोटीकर, मत्स्यविकास मंत्री- शोभा करंदलाजे, ऊर्जा मंत्री- एम. पी. रेणुकाचार्य, अर्थमंत्री

सर्वच भागात भाजप धुव्वा- शहरी आणि निमशहरी भागात काँग्रेसची सरशी- लिंगायत पट्‌ट्यात केजीपीला सर्वाधिक फायदा- दक्षिण कर्नाटकात जेडीएसला सर्वाधिक फायदा

काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच

कर्नाटकात बहुमत मिळवून काँग्रेस सरकार स्थापन करणार हे स्पष्ट झाल्यानंतर काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेनं जोर धरला आहे. के. सिद्दरामय्या, जी. परमेश्वर आणि केंद्रीय मंत्री मल्लिकार्जुन खरगे ही नावं आघाडीवर आहेत. त्यातही जी परमेश्वर हे स्वतः पिछाडीवर असल्याचं आतापर्यंतच्या निकालावरून दिसतंय. के. सिद्दरामय्या यांच्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी फारशा अनुकूल नाहीत. त्यामुळे मल्लिकार्जून खरगे यांचंच नाव मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर आहे.

मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच

______________________________________

- एस. सिद्धरामय्या

बलस्थान- प्रभावशाली मागासवर्गीय नेते उणिवा- 2006मध्ये काँग्रेसमध्ये आल्याने बाहेरचे नेते अशी ओळख

______________________________________

- मल्लिकार्जुन खरगे

बलस्थान- एस. एम. कृष्णांनंतरचे सर्वात ज्येष्ठ नेते- प्रभावशाली दलित नेते- गांधी कुटुंबीयांचे निकटवर्तीयउणिवा- केंद्रात मंत्री असल्यानं नाव वगळलं जाऊ शकतं- फारसे लोकप्रिय नाही

______________________________________

- डॉ. जी. परमेश्वरा

बलस्थान- उच्च शिक्षित- शहरी मतदारांवर प्रभाव पाडण्याची क्षमता- गांधी कुटुंबीयांचे निकटवर्तीयउणिवा- अनेक ज्येष्ठ नेत्यांना नामंजूर- मागासवर्गीय मतदारांमध्ये प्रभाव नाही

______________________________________

वीरप्पा मोईली

बलस्थान- राज्यातल्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक- प्रशासकीय कामकाजाचा दीर्घ अनुभव- स्वच्छ प्रतिमाउणिवा- आमदारांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता कमी- जनाधार आणि जातीचा आधार नाही

_________________________________

एस. एम. कृष्णा

बलस्थान- पक्षातले सर्वात ज्येष्ठ नेते- प्रशासकीय कामकाजाचा प्रदीर्घ अनुभवउणिवा- वय मुख्यमंत्रीपदाआड येऊ शकतं- जुन्या म्हैसूर भागातून पक्षांतर्गत विरोध

_________________________________

के. एच. मुनियप्पा

बलस्थान- जेडीएस, केजेपी या पक्षांशी जवळचे संबंध- तरुण दलित चेहराउणिवा- संपूर्ण कर्नाटकात छाप नाही

कर्नाटक विधानसभेचा निकाल 2013 काँग्रेस भाजप जेडीएस केजेपी इतर एकूण 223/112(M) 121 40 40 06 16 223

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 8, 2013 04:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close